भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 40 गावांसाठी वरदान- आमदार भारत भालके - Pantnagari Times

Breaking News

Sunday, June 2, 2019

भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 40 गावांसाठी वरदान- आमदार भारत भालकेमंगळवेढा / मदार सय्यद

------------------------------

       

                दुष्काळी तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने आटोकाट प्रयत्न केले जात असताना यंदाच्या भीषण दुष्काळात भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही 40 गावांसाठी मात्र वरदान ठरली आहे. या योजनेमुळे या भागातील लोकांना दुष्काळाची भीषण दाहकता जाणवू दिली नाही.

नदीकाठची गावे वगळता तालुक्यातील 62 गावांना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात   संघर्ष करावा लागतो. त्यामधील पुर्व भागातील गावे नंदुर योजनेत तर पश्चिम भागातील गावे आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अखत्यारीत  येतात.2009 लोकसभा निवडणुकीत या भागात टाकलेल्या बहिष्कारामुळे पाण्याचा राष्ट्रीय पातळीवर गेला. आ. भालकेनी लोकवर्गणीची अट रद्द करून ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. तालुक्यातील 40 गावांचा समावेश करण्यात आला.तीन झोन च्या माध्यमातून हे पाणी 40 गावाला अस्तित्वात असलेल्या उंच टाक्या व काही ठिकाणी नवीन टाक्याच्या माध्यमातून या नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले.


2015 च्या लोकसंख्येनुसार 91 हजार 833 लोकांना सध्या या योजनेतील पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे अशी योजना करत असताना 2030 सालचे एक लाख अकरा हजार 755 इतकी लोकसंख्या गृहीत धरून ही योजना सुरू करण्यात आली यामध्ये 40 लिटर दरडोई पाण्याचे प्रमाण निश्चित केले.सध्या तीन लाख 67 हजार दशलक्ष लिटर पाणी गृहीत धरण्यात आलेले आहे. आठ लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून हे पाणी दिले जात आहे सध्या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता या पाणीपुरवठा केंद्रातून 40 गावासह 42 टॅकरने 45 वाडीवस्तीला पाणी पुरवले जात आहे यंदाच्या दुष्काळामध्ये ही योजना या भागातील जनतेसाठी लाभदायक ठरली आहे.


समाविष्ट गावे....

गोणेवाडी झोप:- गोणेवाडी, पाटकळ, खुपसंगी ,डोंगरगाव, हाजापुर, हिवरगाव, लेंडवेचिंचाळे, शिरसी, जुनोनी ,मेटकरवाडी, खडकी

भुयार झोप:- जंगलगी पाऊट हुलजंती माळेवाडी सोड्डी शिवणगी आसबेवाडी सलगर खुर्द सलगर बुद्रुक मारोळी लवंगी येळगी 

नंदेश्वर झोन :- नंदेश्वर ,सिद्धनकेरी , जालीहाळ भाळवणी भोसे हुन्नुर रडे शिरनांदगी चिक्कलगी जित्ती येड्राव लोणार मानेवाडी पडोळकरवाडी महमदाबाद निंबोणी बावची


2009 पूर्वी या भागातून फिरताना भगिनीला पोटासाठी रोजगार बुडू नये म्हणून मुला मुलींची शाळा पाण्यासाठी बुडवली जात असे मुलांचे शिक्षण आणि भगिनी चा रोजगार कायम मिळावा म्हणून लांबून आणावा लागणारा डोक्यावरील हंडा कमी करण्यासाठी मी प्रयत्न केले या योजनेच्या पुर्णत्वामुळे याचा लाभ या भागातील जनतेला मिळत असल्याचे समाधान मिळाले पण जर ही योजना नसती  तर या भागातील जनतेला स्थलांतरित व्हावे लागले असते 

- आ. भारत भालके  पंढरपूर मंगळवेढा विधानसभा .

Pages