शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची 'कॅबिनेट'पदी वर्णी - Pantnagari Times

Breaking News

Thursday, May 30, 2019

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची 'कॅबिनेट'पदी वर्णी       मुंबई / प्रतिनिधी

---------------------------- 

  

        काँग्रेसचे देशभर सुपडा साफ करून भाजपने बहुमताने विजय प्राप्त केला आणि त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेणार हे अधोरेखित झाले. दरम्यान आज राष्ट्रपती भवनात सांयकाळी ७ वाजता शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी काही खासदांराना केंद्रीय मंत्री म्हणूनही शपथ देण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांचादेखील समावेश असल्याचे वृत्त आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शपथविधीसाठी अरविंद सावंत भल्या पहाटे आपल्या कुटुंबासह दिल्लीला रवाना झाले आहेत. तसेच शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासहित उपस्थित राहणार आहेत.

मंगळवारी ५ तास आणि आज बुधवारी ४ तास मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात केंद्रातील मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली आहे. गुरुवारी पंतप्रधानांसह महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईल. मागील मंत्रिमंडळात शिवसेनेचा केवळ एक मंत्री होता. मात्र यंदा किमान २ मंत्रिपदे शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई, भावना गवळी, विनायक राऊत, राहुल शेवाळे, अरविंद सावंत यांची नावे चर्चेत होती.

दक्षिण मुंबईमधून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना १,००,०६७ मतांनी पराभूत करून सावंत हे दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. अरविंद सावंत यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून व संसदेत सर्वात जास्त उपस्थिती असलेले खासदार म्हणून गौरवण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या खासदारांना मंत्रिपद दिलं जाईल अशी शक्यता आहे.

Pages