हुन्नूर येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, May 8, 2019

हुन्नूर येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरीमंगळवेढा / प्रतिनिधी

हुन्नूर तालुका मंगळवेढा येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 914 वी जयंती ग्रामपंचायत येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेची पूजन मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रवीणकुमार (बापू) साळे, संगमेश्वर चौगुले, रावसाहेब कोरे, मच्छिंद्र पुजारी,  पोपट शिंदे, लक्ष्‍मण गावडे, अण्णा पाटील, रमेश चौगुले, मायाप्पा धुलगुडे (सर), विक्रम पुजारी, भानुदास सरगर, विजय साळुंखे, बंडू गुरव, पांडुरंग शिंदे, आदी उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय लिंगायत सन्मवय समितीचे मंगळवेढा तालुका सन्मवयक संगमेश्वर चौगुले, आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मंगळवेढा येथे  महात्मा बसवेश्वर यांचे राष्ट्रीय स्मारक मंजूर झाले असून स्मारकाचे कार्यवाही  लवकरात लवकर होऊन स्मारकाच्या कामाला सुरुवात व्हावी अशी मागणी यावेळी चौगुले यांनी केली.


Pages