नक्षलवाद्यांना फोडून काढा प्रहार संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी - Pantnagari Times

Breaking News

Saturday, May 4, 2019

नक्षलवाद्यांना फोडून काढा प्रहार संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी


नक्षलवाद्यांना फोडून काढा प्रहार संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी 

सोलापूर / प्रतिनिधी

राज्यात माेठ्या उत्साहात  महाराष्‍ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोली मधील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला या स्फोटात 16 जवान शहीद झाले होते गडचिरोलीमधील सहा भंडारा जिल्ह्यातील तीन बुलढाणा जिल्ह्यातील दोन तसेच हिंगोली बीड नागपूर यवतमाळ येथील प्रत्येकी एक जवानांचा समावेश आहे ही घटना घडून अनेक पोलिसांचा ,जवानांचा मृत्यू झालेला आहे हे सर्व प्रकार गंभीर असताना केंद्र आणि राज्य सरकार हे अशा घटनेबाबत कोणतीही ठोस पाऊल उचलत नसल्याने पुन्हा एकदा या नक्षलवाद्यांची दहशत पहावयास मिळत असल्याने सर्व नक्षलवाद्यांना ठोकून काढण्याचे आदेश देण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांच्या शिष्टमंडळाने मागणी केली आहे. 

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात आजही पोलीस प्रशासन तसेच जवानांना या नक्षलवाद्यांकडून सातत्याने हल्ले होऊन अनेक जवान व पोलिसांना वीर मरण आले आहे जोपर्यंत नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर देत नाही तोपर्यंत हा प्रकार थांबणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे राजकारणातच व्यस्त अाहेत एखाद्या नक्षलवाद्यांकडून हल्ला झाला आणि काही जवान शहीद झाले तर आदरांजली वाहण्यात शिवाय दुसरे काही काम सरकार करत नाही घडलेली घटना पुन्हा घडू नये याबाबत कोणतेही पाऊल सरकार कडून उचलले जात नसल्याने आमच्या सैनिकांना पोलिसांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे याला सर्वस्वी केंद्र राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी केले

तसेच राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून गुन्हेगारी नक्षली हल्ल्यात वाढलेले असून गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम फडणवीस सरकार करत नसल्याने त्या सरकारने तात्काळ सत्तेतून पायउतार व्हावे असा सरकारचा निकाल घडलेल्या नक्षली हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो महाराष्ट्र शासनाने याबाबत लवकरच योग्य पाऊल न उचलल्यास महाराष्ट्र राज्यात प्रहार कडून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदनात नमूद करण्यात आला आहे

यावेळी शहर कार्याध्यक्ष खालीद मणियार, प्रहार अपंग क्रांती जिल्हाध्यक्ष संजीवनीताई बारंगुळे उपप्रमुख मुस्ताक शेत संधी ,सिद्धाराम काळे ,संभाजी वाघमारे धनराज दुलंगे ,विनोद कांबळे ,नवनाथ साळुंखे ,देविदास गायकवाड, विकास गायकवाड ,जगन्नाथ बनसोडे आदी उपस्थित होते.

Pages