रड्डे येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान कार्यशाळा संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, May 29, 2019

रड्डे येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान कार्यशाळा संपन्नमंगळवेढा / प्रतिनिधी

------------------------------

          महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान मोहिमेअंतर्गत आज येथे आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसार पंधरवाडा हंगाम 2019 च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत २५ मे ते ६ जून या कालावधीत रोहिणी नक्षत्र  तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम घेण्यात येत आहे.

काल रड्डे येथे नंदेश्वर कृषी मंडळ अधिकारी ए.एन.कांबळे,कृषी पर्यवेक्षक पी.एन.झोळ,कृषी सहाय्यक महादेव फराटे,कृषी सहाय्यक राजकुमार ढेपे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्म्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विक्रम सावंजी यांनी शेतकऱ्यांना कृषी व संलग्न विभागाच्या विविध योजनांची माहिती करून दिली. बीज प्रक्रिया,माती-पाणी परीक्षण,मका पिकावरील लष्करी अळी,उसावरील हुमणी नियंत्रण आदी बाबत माहिती दिली. यावेळी या कार्यशाळेस गावातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Pages