पवारांचा २३ मे ला नेमका प्लान काय ? मोदींनी जाहीरपणे व्यक्त केली चिंता
मुंबई / प्रतिनिधी
तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीन मध्ये घोळ आहे असा दावा केला होता. त्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये देखील बारामतीच्या निकालावर संशय व्यक्त करत ईव्हीएम मशीन मध्ये घोळ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. जर आम्ही बारामती मध्ये हरलो तर इव्हिएम मशीन मध्ये नक्कीच गडबड केली जाणार असल्याचा दावा शरद पवार यांनी व्यक्त केला होता. यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे.
इंडिया टीव्ही च्या आप की आदालत या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती यावेळी मोदींनी विदेश नीती पासून ते देशातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तसेच शरद पवार यांच्या ईव्हीएम मशीन बाबतच्या वक्तव्याचा मोदींनी समाचार घेतला. यावेळी मोदी म्हणाले की, मी शरद पवार यांचा आदर करतो. तसेच राजकीय विषयांवर त्यांच्याशी सल्ला मसलत करतो. ते जनतेच्या मनातल ओळखणारे नेते आहेत. तसेच त्यांचा राजकीय अनुभव देखील दांडगा आहे. मात्र ते आता बारामतीच्या जागे बाबत चिंतीत आहेत. कारण बारामतीच्या शेजारील गावामध्ये झालेल्या भाजपच्या सभेला एवढी विशाल गर्दी पाहिली तेव्हाच ओळखल होत की बारामतीत शरद पवार याचं काही खर नाही. त्यामुळे शरद पवार आता चिंतीत आहेत. बारामतीत येणाऱ्या अपयशाच खापर ते इव्हिएमवर फोडत आहेत.
दरम्यान २३ मे ला जर बारामती मधून सुप्रिया सुळे पराभूत झाल्या तर लोकांचा निवडणूक प्रकीयेवरील विश्वास उडेल व लोक रस्त्यावर उतरतील असे भाष्य पवारांनी केले होते. हाच धागा पकडत नरेंद्र मोदी यांनी पवारंवर हल्ला करत २३ मे ला पवार काय खेळ करणार आहेत याची निवडणूक आयोगाने दाखल घ्याला हवी. तसेच जनतेने देखील जागृत होयला पाहिजे. असे मोदी म्हणाले. शरद पवार आपल्या तोंडी असे हिंसेचे शब्द शोभत नाहीत असा देखील टोला मोदींनी पवारांना लगावला.