पराभवानंतर शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? - Pantnagari Times

Breaking News

Friday, May 31, 2019

पराभवानंतर शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
  मुंबई / मदार सय्यद

--------------------------


लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या, शनिवारी महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा केली जाणार असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः ही बैठक बोलावली असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला उभारी देण्यासाठी नवे बदल केले जाऊ शकतात. त्यासाठी शरद पवार मोठा निर्णय घेण्याची तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  


वाचा : राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, काँग्रेस– राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, काल गुरूवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत अनपेक्षितपणे भेट घेतली.

वाचा : राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये होणार विलीन?

काँग्रेसच्या नेत्यांनी विलीनीकरणाबाबत प्रस्ताव तयार केला असून त्यानुसार विलीनीकरण झाल्यास शरद पवार यांना राज्यसभेत विरोधी पक्षानेत्याचे पद देण्यात येईल. शरद पवार विरोधकांची एकजूट साधण्याचा प्रयत्न करतील. विलीनीकरणामुळे राष्ट्रवादीच्या पाच खासदारांचेही विलीनीकरण होईल आणि यामुळे काँग्रेस सदस्यांची संख्या वाढून ५७ होईल. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेत्याचे पद मिळू शकेल. त्यानंतर राहुल गांधी विरोधी पक्षनेत्यांचे पद स्विकारतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

Pages