बहुजन वंचित आघाडी कडून एका मेंढपाळ महिलेच्या मुलाने मागितली विधानसभेची उमेदवारी - Pantnagari Times

Breaking News

Thursday, May 30, 2019

बहुजन वंचित आघाडी कडून एका मेंढपाळ महिलेच्या मुलाने मागितली विधानसभेची उमेदवारीबहुजन वंचित आघाडी कडून तानाजी चौगुले इच्छुक


     मंगळवेढा / मदार सय्यद

--------------------------------------मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा मा. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्यातील 288 जागा बहुजन वंचित आघाडी लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे या पक्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बहुजन वंचित आघाडी कडून सध्यातरी नगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते अनिल बोदडे यांच्या बरोबरच सामाजिक कार्यकर्ते तानाजी चौगुले हे बहुजन वंचित आघाडी कडून इच्छुक आहेत त्यामुळे मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाला तिकीट मिळणार हे निश्चित नसले तरी ऐनवेळी बहुजन वंचित आघाडी कडून नवा चेहरा समोर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत बहुजन वंचित आघाडी कायमच भाजपची बी टीम म्हणून हिणवले जात होते परंतु लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर कोण बी टीम आहे हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे आता गोर गरीब घरातील धनगराच्या घरातील मेंढपाळाच्या मुलाने थेट विधानसभेचे तिकीट मागितल्यामुळे बहुजन वंचित आघाडी चे तिकीट तानाजी चौगुले यांना मिळणार का याकडे गोरगरीब जनतेचे लक्ष लागले आहे त्यामुळे कसल्याही परिस्थितीत बहुजन वंचित आघाडी कडून तानाजी चौगुले यांनी निवडणूक लढवण्यासाठी चंग बांधला असल्याचे स्पष्ट संकेत मानले जाते नंदेश्वर सारख्या संवेदनशील गावांमध्ये 549 मध्ये बहुजन वंचित आघाडीला मते मिळवून गावात आपली ओळख निर्माण केली आहे ागा मिळवण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा असला तरी यामध्ये बहुजन योग वर्गाचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे कसले परीस्थितीत त्यांनाच विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे 

सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन तानाजी चौगुले हा युवक निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असून त्यांनी बहुजन वंचित आघाडी च्या माध्यमातून तिकीट मिळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न चालू केला आहे

मंगळवेढा तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीचा निकाल दक्षिण भागावर लागतो त्यामुळे तानाजी चौगुले यांच्या घोषणेकडे सर्व राजकीय कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत आता थेट एका मेंढपाळाच्या मुलाने विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली 

ती वंचित आघाडी कडून केल्यामुळे त्यांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे

मंगळवेढा तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीचा निकाल दक्षिण भागावर लागतो त्यामुळे तानाजी चौगुले यांच्या घोषणेकडे सर्व राजकीय कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत आता थेट एका मेंढपाळाच्या मुलाने विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा तीही वंचित आघाडी कडुन केल्यामुळे त्याच्या या घोषणाकडे लागले आहे

बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर गोपीचंद पडळकर mim प्रमुख औवेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा =पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे तिकिटाचे वाटप केले जाणार आहे त्यामुळे चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आंबेडकर साहेब पडळकर साहेब यांनी जो निर्णय सांगेल तो आमचा खरा निर्णय आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे

कसलयाही परीस्थितीत बहुजन वंचित आघाडी पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढवणार असून यात तिळमात्र शंका नाही आणि आम्ही पुरेपूर निवडणुक लढवाण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले त्यामुळे बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार निश्चितपणे मंगळवेढा पंढरपूर विधानसभा निवडणुकीमध्ये उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले


बहुजन वंचित आघाडी च्या माध्यमातून यापुढे सर्व निवडणूक आम्ही लढणार असून बहुजनांची कार्य करणार आहे 

तानाजी चौगुले

Pages