मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता द्या,अन्यथा आंदोलन जि.प. सदस्या शैला गोडसे यांचा इशारा.... - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, May 28, 2019

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता द्या,अन्यथा आंदोलन जि.प. सदस्या शैला गोडसे यांचा इशारा....



कार्यवाही न झाल्यास १ जुन पासुन नंदेश्वरमध्ये होणार ठिय्या आंदोलन


मंगळवेढा / मदार सय्यद

------------------------------

               मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाचा दुष्काळ मिटविण्यासाठी मंजूर झालेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन कामाला सुरुवात न केल्यास १ जून पासून नंदेश्वर येथील मंदिरात शिवसैनिक व शेतकऱ्यांसोबत ठिय्या आंदोलन केले जाईल. असा गर्भित इशारा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. अधीक्षक अभियंता यांना शैला गोडसे यांनी निवेदन दिले आहे.  

मंगळवेढा उपसा सिंचन योजना 2014 साली मंजूर झाली. 2014 पासून आजपर्यंत ही योजना कार्यान्वित झाली नाही. एखादी योजना मंजूर झाल्यापासून पाच वर्षात सदर योजनेस निधी अथवा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही तर ती योजना रद्द होते.

   राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व शिवसेना उपनेते आ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत अधीक्षक अभियंता 2018 मध्ये यापूर्वीही निवेदन दिले होते. तसेच प्रत्यक्ष भेटूनही तीन ते चार वेळा पाठपुरावा केला होता. पण अधीक्षक अभियंता शिंदे यांचे कडून कसलीही कार्यवाही होताना दिसत नाही.त्यामुळे सदर योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन व या योजनेचे पाणी कमी न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा शैला गोडसे यांनी दिला आहे.

Pages