मंगळवेढा / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्यावतीने पाठखळ येथे जनावरांच्या चारा छावणीत जनावरांना पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे यांच्या हस्ते पशूखादय वाटप करण्यात आले.
सुरुवातीस पत्रकार तानाजी चौगुले यांनी पत्रकार संघाच्या सामाजिक कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन भिमराव मोरे यांनी केले.
या कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे,माजी अध्यक्ष प्रमोद बिनवडे,शिवाजी केंगार,पत्रकार सुरक्षा समितीचे तालुकाध्यक्ष मोहन माळी,मंगळवेढा तालुका साप्ताहिक संपादक संघटनेचे अध्यक्ष समाधान फुगारे,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार जाधव यांचेसह सुलेमान तांबोळी,केशव जाधव,दत्तात्रय कांबळे,प्रशांत माळी,संभाजी मस्के,नवनाथ देशमुखे,दादासाहेब लवटे,लखन कोंडुभैरी,मदार सय्यद, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सावत,यांचेसह महादेव सावत,अंकुश खुळे, गजेंद्र नलवडे, सुनील कोळेकर, गोरख निंबाळकर, सिद्धेश्वर सावंत, प्रदीप पवार,संतोष भोसले, मामा हाके, आनंदा लुगडे, भिमराव सोलंकर, बिराप्पा कोळेकर,नवनाथ पांढरे,विजय ताड आदी ग्रामस्थ व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.