शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचे पंढरीरत्न पुरस्कार जाहीर
पंढरपूर / प्रतिनिधी
26 मे रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार गुणवंताचा गौरव
शिवबुध्द युवा प्रतिष्ठाच्या वतीने देण्यात येणारे पंढरीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून रविवार दिनांक 26 मे रोजी येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी योगा प्रणायम संस्था, योगा भवन, गयाबाई नगर, एल.आय.सी.ऑफिस शेजारी पंढरपूर जिल्हा सोलापूर, येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळ्यात हे मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी मा.श्री.भागवत महाराज चवरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन आ.भारत (नाना ) भालके,समाधान (दादा )आवताडे चेअरमन दामाजी सह.सा.का.मंगळवेढा,
नगराध्यक्षा साधनाताई भोसले,प्रवण परिचारक उपसरपंच ग्रामपंचायत खर्डी , मधुसुदन बर्गे साहेब,(तहसिलदार) अभिजीत बापट साहेब, (मुख्याधिकारी न.पा पंढरपूर)हे उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून सौ अरूणाताई सोमनाथ माळी (नगराध्यक्षा मंगळवेढा )अजितजी जगताप,(नगरसेवक मंगळवेढा ) संजय (बाबा) ननवरे,किरणराज घाडगे, संतोष कवडे, कृष्णा वाघमारे, शाहजान शेख, महेश साठे , विनोदराज लटके, संदिप जाधव - पाटील, शैलेश आगवणे, सुमित शिंदे, आप्पासाहेब गाजरे -भोसले, दिलीप गुरव, येताळा खरबडे, शहाजी शिंदे, लखन थिटे, आदी उपस्थित राहणार आहेत.
शिवुबध्द युवा प्रतिष्ठाणच्या वतीने पंढरी रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्याचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत.1)उत्कृष्ट प्रशासकीय सेवा सचिवजी ढोले साहेब 2) युवा पत्रकार दिगंबर दगडू भगरे 3) उत्कृष्ट समाजसेवा शिवक्रांती युवा संघटन दत्ता काळे 4) साहित्यीक कवी लेखक बाबुराव नामदेव धांडोरे 5) आदर्श शिक्षक संतोष बबन दुधाळ (मंगळवेढा )6) ग्रामिण मराठी दिग्दर्शक/कलाकार अनिल गुलाबराव केंगार (पंढरपूर ) 7) वैद्यकिय समाजसेवा डाॅ. शितल शहा 8) क्रिडारत्न कु.धनश्री औदुंबर भोसले 9) उत्कृष्ट युवा उद्योजक बापूसाहेब बारले10)उत्कृष्ट किल्ला सजावट आकाश श्रीकांत पवार, यांना शिवबुध्द पंढरीरत्न विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे अशी माहीती शिवबुध्द युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे सर्व पदाधिकारी यांनी दिली आहे....