मंगळवेढा / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने मरवडे येथील जनावरांच्या चारा छावणीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या हस्ते सोमवार दि 27 मे रोजी पशुखाद्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस पत्रकार अक्षय टोमके यांनी पत्रकार संघाच्या सामाजिक कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर मरवडेतील पैलवान दामोदर घुले, पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष मोहन माळी, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी केंगार, श्रीकांत मेलगे, पत्रकार दादासाहेब लवटे, पत्रकार विलास काळे, पत्रकार बापू मासाळ, प्रशांत केंगार, गणपत पवार, सुनील गायकवाड, विशाल जाधव, समाधान गणपाटील, विजय गणपाटील, संजय गायकवाड अक्षय गायकवाड,रघुनाथ गणपाटील, लखन बावचे, बंडू गायकवाड सुशील केंगार,शशी काळे,दगडू गायकवाड,महेश गणपाटील, सर्जेराव पाटील,अनिल गायकवाड,सुधाकर पाटील, मधुकर जाधव,राजू कोलते, राहुल जाधव, रंगनाथ जाधव यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
युवक नेते श्रीकांत गणपाटील यांनी ग्लोरेस इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड अकॅडमी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीत लहान-मोठी पाचशे जनावरांना आज पशुखाद्य वाटप करण्यात आले सदर छावणीतून सुरळीतपणे पशुखाद्य व चारा मिळत असल्याने येथे शेतकऱ्यांनीही यावेळी समाधान व्यक्त केले पत्रकारांचे समाजोपयोगी कार्यक्रमाचे शेतकऱ्यांनी विशेष कौतुक केले.
शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवक नेते श्रीकांत गणपाटील यांनी मानले.