शेळ्या-मेंढ्या साठी चारा छावण्या त्वरित सुरू करा - अंकुश गंरडे - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, May 14, 2019

शेळ्या-मेंढ्या साठी चारा छावण्या त्वरित सुरू करा - अंकुश गंरडेमंगळवेढा / प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याचा विचार करत मंगळवेढा पंढरपुर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे या समाजाची गुजरान शेळी-मेंढीपालन यावर असून शासनाने आता जनावरांसाठी चारा छावण्या केल्या आहेत परंतु शेळी मेंढी पालणावर हा समाज आपल्या कुटुंबाला गुजराण करत आहे 

या भागामधे धनगर समाज ज्या व्यवसायावर अवलंबून आहे त्या शेळी-मेंढीपालन करणार शेतकऱ्यांना काहीच पदरात पडले नाही त्यामुळे तातडीने शेळ्या-मेंढ्या साठी चारा छावणी सुरू कराअशी मागणी मल्हार महासंघाचे तालुकाध्यक्ष अंकुश गंरडे यांनी मागणी केली आहे 

ते बोलताना म्हणाले धनगर समाज हा शेळी मेंढी पालन करून जगणारा समाज आहे शासनाने यात मोठ्या जनावराची दखल घेतली आहे परंतु मेंढपाळाची दखल त्यांनी घेतली नाही मेंढ्या साठी चारा छावणी सुरू करण्याची गरज असताना सुद्धा शासनाने याची दखल घेतली नाही मंगळावेढ्याचा दक्षिण भागामध्ये मोठा मेंढपाळ समाज आहे तरी शासनाने दखल घेतली नाही या भागात नेतेमंडळींचे दौरे चालू आहेत पालकमंत्री, महसूल मंत्री, आले परंतु धनगर समाजाच्या प्रश्नाला त्यांनी हात घालत मेंढपाळाची व्यथा जाणून घेतली नाहीत त्यामुळे यापुढील काळात शेळ्या-मेंढ्या साठी चारा छावणी सुरु केली नाही तर धनगर समाज कुटुंब सहीत आंदोलन करण्याच्या तयारीत आहे असा इशारा मल्हार महासंघाचे तालुकाध्यक्ष अंकुश गंरडे यांनी दिला यावेळी बहुजन वंचित आघाडीचे तानाजी चौगुले उपसंरपच राहुल कसबे ,दिगंबर गंरडे सचिन करे भाऊसाहेब सलगर ,सिद्धनाथ कसबे, रमेश कसबे बाबा कसबे ,उपस्थित होते

Pages