मंगळवेढा / प्रतिनिधी
--------------------------------
हुन्नूर ता. मंगळवेढा येथील साप्ताहिक पंतनगरी टाईम्स चे संपादक मदार सय्यद यांच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला करून जखमी केले त्यांना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचार केले असून सदर घटनेची नोंद मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की काल शनिवारी रात्री चुलते गुजर हुसेन मुलाणी, यांच्या नव्या कार्यक्रमाचा विधि होता. उद घालण्यासाठी गेले असता रशीद मुलाणी, यांने पत्रकार मदार सय्यद यांना तू आमची शूटिंग काढतो का आमचे रेकॉर्डिंग केले का इथे कशाला आला असे म्हणून मोबाईल काढून घेतला तोपर्यंत इब्राहीम मुलांनी याने पाठीमागून आला व त्याने लोखंडी रॉड डोक्यात मारला डोक्यातून रक्त स्त्राव होऊ लागला त्यावेळी हसन मुलानी यांने लोखंडी टाँमीने पाठीवर उजव्या हाताच्या पंजावर गुडघ्यावर उजव्या पायाच्या पंज्यावर मारहाण केली टी-शर्टला धरून झोबा झोबी करत असताना सलामत शेख, करीम मुलांणी, यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यावेळी यावेळी पत्रकार सय्यद, यांच्या गळ्यातील सोन्याची चेन दहा ग्रॅम वजनाची इब्राहीम मुलाणी, व हसन मुलाणी, यांनी चेन हिसका देऊन काढून घेतले इब्राहीम मुलाने यांचा आरडीएक्स व्यवसाय असून त्याने पत्रकार सय्यद यांच्या कुटुंबाला आरडीएक्स ने ब्लास्ट करून टाकणार अशी धमकी दिल्यामुळे कुटुंब भयभीत झाले असुन घटना घडल्यापासून सदर आरोपी उघड माथ्याने गावातून फिरत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास डी. ए. घोंगडे, करत आहेत.