सोलापूर / प्रतिनिधी
---–-----------------------------
सोलापूर महापालिका परिवहन कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाहक बळी गेला असल्याने संबंधित दाेषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी यासह विविध विषयावर चर्चा करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चूभाऊ कडू हे म.पा आयुक्तांशी दि.१३/५/२०१९ राेजी येणार असल्याचे पञ महापालिका आयुक्त डॉ दिपक तावरे यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले. वरील प्रश्नांचा चर्चेतून मार्ग निघाला नाही तर आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार आयुक्तांची खुर्ची पेटवल्याशिवाय साेडणार नसल्याचे मत जिल्हाप्रमुख दत्तात्रय मस्के पाटील आणि शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
परिवहन व्यवस्थापक अशाेक मल्लाव यांना आ.कडू धडा शिकवणार
परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या बेकायदेशीर कामकाज करीत असल्याने तसेच त्याबद्दल अनेक तक्रारी असताना सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही तसेच पुन्हा तोच परिवहन व्यवस्थापक पत्रकार परिषद घेऊन इतर तत्कालीन अधिकाऱ्यांचे नावे खापर फोडतो पण स्वतः काय दिवे लावले हे कुठेही सांगत नाही. परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव आल्यापासून परिवहन स्थिती आणखी बिकट होत चालल्याचे दिसत आहे .याबाबत आमदार बच्चू कडू हे परिवहन व्यवस्थापक कार्यालयास सुद्धा भेट देऊन त्याला जाब विचारणार आहेत. तसेच प्रहार कामगार संघटनेचे उपप्रमुख देविदास गायकवाड यांच्यावर बेकायदेशीरपणे केलेली कारवाई तातडीने मागे घ्यावी अशी मागणी ही करणार अहे.
सदर निवेदन देतांना साेलापूर- सातारा जिल्हा संपर्कप्रमुख आझादसिंग उर्फ शंभुराज खलाटे,प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख संजिवणीताई बारांगुळे, शहर संपर्क प्रमुख जमीरभाई शेख, कार्याध्यक्ष खालीद मणियार, उपप्रमुख संभाजी वाघमारे,नवनाथ साळुंखे, मुदस्सर हुंडेकरी आदी उपस्थित होते .