शैला गोडसे 35 गाव पाणी प्रश्न निधी आणण्याऐवजी स्टंटबाजी करतात - निर्मला काकडे - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, May 29, 2019

शैला गोडसे 35 गाव पाणी प्रश्न निधी आणण्याऐवजी स्टंटबाजी करतात - निर्मला काकडेमंगळवेढा / मदार सय्यद

------------------------------


मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेच्या कामास विद्यमान युती सरकारकडून निधी न देता अडथळा निर्माण केला जात आहे मात्र सत्तेतील शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या शैला गोडसे  ह्या योजनेच्या पाणीप्रश्नाबाबत केवळ राजकीय स्टंटबाजी करीत असून सरकार कडून या योजनेस निधी मिळवण्याऐवजी आंदोलन करीत आहेत 

त्यांचे पती जल संपदा विभागात महत्वाच्या पदावर काम करीत आहे त्यामुळे शासन स्तरावर सुरू असलेल्या महत्त्वाच्या माहिती अगोदरच समजतात त्या कामाच्या अनुषंगाने पत्रव्यवहार करून एखाद्या कामाबाबत आपल्या प्रयत्नामुळे कसे यश मिळाले याबाबत प्रसिद्धीमाध्यमांत माहिती दिली जाऊन राजकीय उद्देशासाठी सवंग लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतो त्यांच्या या प्रकाराला आमची हरकत नाही मात्र या भागातील पाणी प्रश्न हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून याबाबत राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही आम्ही झटत असलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठीच ही धडपड सुरु असल्याची टीका माजी पंचायत समिती सभापती निर्मला काकडे यांनी केली आहे 

मंगळवेढा  तालुक्यातील दक्षिण भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी गेली दहा वर्षे या भागातील नागरिक सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करीत आहेत अशक्य असणाऱ्या पस्तीस गावच्या उपसा सिंचन योजना विदर्भाचा अनुशेष असतानासुद्धा राज्यपालांच्या विशेष परवानगी ने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवत  2014 मध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली त्यामुळे या भागातील जनतेला पाणी मिळण्याची आशा निर्माण झालेली असताना गेली पाच वर्षे सत्तेत असणार्‍या भाजप-शिवसेनेच्या सरकारने विरोधी पक्षाचा आमदार असल्याने या योजनेला निधी देण्यास टाळाटाळ केली हेेेेच लक्षात आल्यानंतर  माझ्यासहित येथील काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून या योजनेचा निधी देण्याबाबतचे आदेश सरकारला दिले त्यानुसार सरकारने या योजने ची  फेरमांडणी सुरू केली परन्तु फेरमांडणी करण्याच्या नावाखाली निधी देण्यास सरकार विलंब केला जात आहे सध्याचे सरकार भाजपा शिवसेनेचे सरकार असून या सरकार मधीलच शिवसेना पक्षाचे  महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या  गोडसे यांनी आपल्या गॉडफादर मार्फत मंगळवेढा च्या पाणीप्रश्नाबाबत अनेकवेळा स्टंटबाजी केली आहे सत्तेतील सरकार  व  मंत्री पाणीप्रश्नांकडे दुर्लक्ष करीत  पदाधिकाऱ्यांच्या मागणीला किंमत देत नाहीत  पदाधिकारी मात्र तालुक्यात पाणीप्रश्नावरून केवळ जनतेची दिशाभूल करण्याच्या हेतूने आंदोलनाची भाषा करून स्टंटबाजी करीत आहेत म्हैसाळचे पाणी शिरनांदगी तलावात पाणी आल्याखेरीज उठणार नाही अशी  वल्गना करणाऱ्या गोडसे यांनी पाणी न येताच आंदोलन संपवले  परन्तु अद्यापर्यंत तलावात पाणी आले नाही परंतु त्या मुग गिळून गप्प आहेत शासनाच्या हालचाली लक्षात घेऊनच नंदेश्वर येथे आंदोलनाची घोषणा करीत आहेत परंतु त्यांनी आंदोलन करण्या ऐवजी आपल्या सरकारच्या मंत्र्यांकडे जाऊन या योजनेसाठी निधी देण्यास भाग पाडले तर बरे होईल गोडसे यांना लिंबू ठेवून नारळ उचलायची सवय असल्याने निवडुन  आलेल्या जिल्हा परिषद गटातील लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्नाबाबत पुतना मावशीचे प्रेम दाखविण्याची गरज नाही परंतु केवळ राजकारणाच्या हेतूने प्रेरित होऊन गोडसे ह्या केवळ स्टंटबाजी  करीत असल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे.

Pages