31 मे वर्ल्ड नो टोबॅको डे” दिनानिमित्त मिरज येथे सलाम मुंबई फाऊंडेशन,सहाय्यक सेवाभावी संस्था, च्या वतीने मुख तपासणी शिबिर - Pantnagari Times

Breaking News

Thursday, May 30, 2019

31 मे वर्ल्ड नो टोबॅको डे” दिनानिमित्त मिरज येथे सलाम मुंबई फाऊंडेशन,सहाय्यक सेवाभावी संस्था, च्या वतीने मुख तपासणी शिबिर
सांगली / मदार सय्यद

------------------------------


       “31 मे वर्ल्ड नो टोबॅको डे” दिनानिमित्त सलाम मुंबई फाऊंडेशन, जिल्हा परिषद सांगली, सहाय्यक सेवाभावी संस्था,खटाव व भारती विद्यापीठ डेंटल विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती मिरज येथे सर्व कर्मचाऱ्यांचे मुख तपासणी शिबिर व तंबाखूचे व्यसन केल्याने आपल्या शरीरावर कोण कोणते दुष्परिणाम होतात यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सध्या आपल्या सांगली जिल्ह्यात तंबाखू,गुटखा,मावा, सिगारेट, मीश्री यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण तरुण पिढीमध्ये वाढत चाललेले आहे, ही पिढी आरोग्यमय जीवन जगावे यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन ही संस्था आज संपूर्ण महाराष्ट्रात व सात राज्यात देखील काम करीत आहे. भारती विद्यापीठ यांच्यामार्फत सर्व कर्मचाऱ्यांचे मुख तपासणी करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मिरज तालुक्याचे आरोग्य अधिकारी श्री. व्ही. पी.सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सलाम मुंबई फाऊंडेशन चे अधिकारी श्री. रवी कांबळे (साहेब), श्री रणजीत नानगुरे, सौ.ज्योती राजमाने (मॅडम) भारती विद्यापीठ चे डॉ.श्री. हर्षवर्धन कलघटगी (असोसिएट प्रोफेसर) डॉ. विद्या (मॅडम) प्रिन्सिपल भारती विद्यापीठ डेंटल विभाग, एस एन इंगळे, सुरेश कांबळे विस्ताराधिकारी आरोग्य विभाग पंचायत समिती मिरज व इतर अधिकारी उपस्थित होते.

Pages