पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीस 13 वंशज भुषणसिंह होळकर 1 जुन ला पंढरीत - Pantnagari Times

Breaking News

Thursday, May 30, 2019

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीस 13 वंशज भुषणसिंह होळकर 1 जुन ला पंढरीतपंढरपूर / मदार सय्यद

-------------------------------

             राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 व्या जयंती महोत्सव सोहळयासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे 13 वे वंशज युवराज भुषणसिंह होळकर हे 1 जुन 2019 रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतिर्थ येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

पंढरपूर शहर व तालुका धनगर समाजाच्या वतीने राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 व्या जयंती महोत्सवाचे पंढरीत आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 31 मे रोजी सकाळी ठिक 9 वाजता प्रतिमा पुजन व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.यावेळी तहसिलदार मधुसुदन बर्गे,नगर पालीकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट,शहर पोलीस निरिक्षक राजेस गवळी,तालुका पोलीस निरिक्षक धनंजय जाधव,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,विठ्ठल मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील डॉक्टर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

शनिवार दिनांक 1 जुन रोजीअहिल्यादेेेेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन व भव्य मिरणवूक होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभुषण आ.गणपतराव देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून ना.राम शिंदे,समाजभुषण गोपीचंद पडळकर,मा.आ.प्रकाश शेंडगे,आ.रामहरी रुपनर,आ.भारत भालके,आ.प्रशांत परिचारक,आ.दत्तात्रय सावंत,नगराध्यक्षा साधनाताई भोसले, चेअरमन कल्याणराव काळे,चेअरमन समाधान आवताडे,चेअरमन भाऊसाहेब रुपनर,उत्तमराव जानकर,संजय क्षिरसागर,चंद्रकांत देशमुख,शैलाताई गोडसे,वैशाली सातपुते,समताताई गावडे,राणीताई माने,उपनगराद्यक्षा लतिका डोके,सभापती राजेंद्र पाटील,शिवाजी कांबळे,संतोष वाकसे,अरुण घोलप,छायाताई मेटकरी,वामन माने,तानाजी खरात,दत्तात्रय कोंडोलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या जन्मोत्सव सोहळयास सर्वसामाज बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन      पुण्ययश्लोक अहिल्यादेवी होळकर  मध्यवर्ती  जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Pages