मंगळवेढा / मदार सय्यद
-----------------------------------
भाजप हे शेतकरी विरोधी सरकारने गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यांची फसवणूक करून पदरी घोर निराशा पडली असल्याचा आरोप आ.भारत भालके यांनी केला आहे.ते माचणूर येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलत होते.यावेळी व्यासपिठावर रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा, प्रा.शिवाजीराव काळुंगे, विजय खवतोडे, लतिफ तांबोळी, माजी सभापती भुजंगराव पाटील, जि.प.सदस्य नितीन नकाते, पी.बी.पाटील, सुरेश कोळेकर, अर्जुन पाटील, भारत बेदरे, अजित जगताप,अंजली मोरे याच्यांसह आदीजण उपस्थित होते

आ.भालके पुढे म्हणाले, मागील साडेचार वर्षाचा मतदारांनी मागोवा घेतला असता आपल्या पदरात काय पडले आहे याचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. या सरकारने पूर्णतः शेतकरी, मजूर वर्गाकडे दुर्लक्ष केले आहे. पिक विम्याच्या रक्कमा मंगळवेढयाला मिळाल्या नाहीत, दक्षिण भागातील शेतकर्यांच्या मागणीनुसार दुष्काळ जाहीर केला पण त्याला भरीव असा निधी देवून त्या सुरू करायला हव्या होत्या.त्यामध्येही जाचक अटी लादून वंचित ठेवण्याचा प्रकार या सरकारने केला आहे.विरोधी पक्षाचा आमदार म्हणून या मतदारसंघातील प्रश्नासाठी अनेक वेळा मी तारांकित व लक्षवेधी प्रश्न मांडले आहेत. अन्याया विरोधात असून मी जनतेच्या सोबत आहे. जनतेच्या हितासाठी व न्यायासाठी मी कितीही गुन्हयाचा स्विकार करेन. मराठा आरक्षणपासून माझ्यावर खुप लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी खुलासा केला.शेती मालाला भाव नाही, पेट्रोल,डिझेल गॅसची वाढती महागाई पाहता सर्व सर्व मित्र पक्षाच्या पदाधिकार्यांनी ग्रामीण व शहरी भागातील सर्व मतदारांपर्यंत जावून प्रचार केला पाहिजे. जिल्हयात आपल्या मतदार संघातून प्रचंड मताधिक्य देण्यासाठी आपण सारेजण प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दामाजीचे माजी संचालक धनंजय पाटील यांनी केले.कार्यक्रमास भारत पाटील, भारत नागणे, विजय खवतोडे, पांडूरंग नाईकवाडी, राहूल सावंजी, राहूल घुले, महादेव फराटे,मारूती वाकडे, युवराज शिंदे, इश्वर गडदे औदुंबर मोरे, संजय कोळी, संजय कोळी, महादेव जाधव, विलास डोके, चंद्रकांत घुले, भिमराव मोरे, तानाजी पाटील, बाबासाहेब पाटील, अशोक माने, अशोक चेळेकर,भिमा आसबे, मल्लू बिराजदार, सिद्राया चौगुले, मिलिंद ढावरे, नानासो मलगोंडे, मनोहर कवचाळे, रामचंद्र मळगे, संदिप घुले, नाथा ऐवळे, ज्ञानेश्वर पुजारी, हैदर केंगार, विनायक नागणे, संजय पाटील, श्रीमंत केदार यांच्यासह महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष अंजली मोरे, सौ.तांबोळी आदी महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.