मंगळवेढा येथील ऋतुजा नागनाथ जोध प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम
मंगळवेढा / मदार सय्यद
-------------------------------------
मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल मधील सातवी इयत्तेमधील ऋतुजा नागनाथ जोध ही अक्षरगंगा राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत 300 पैकी 288 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक आली आहे. परीक्षेत यश मिळवण्याकामी ऋतुजा हिला शिवलिंग राऊत, जाधव सातवी मधील इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक आई वडील नागनाथ जोध मोठा भाऊ दशरथ जोध, यांचे मार्गदर्शन लाभले ऋतुजा ही भोसे तालुका मंगळवेढा येथील मंडळ अधिकारी नागनाथ जोध त्यांची कन्या आहे तिच्या यशाबद्दल प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार स्वप्निल रावडे, ऍड सुजित कदम, व मंगळवेढा तालुक्यातुन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे