महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा संवाद दौरा...शैला गोडसे
मंगळवेढा / प्रतिनिधी
-------------------------------
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा रासप आरपीआय महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महा स्वामी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने गावागावांमध्ये जनतेशी संपर्क साधून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ग्रामस्थांनी भरघोस मतदान करावे म्हणून शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांच्या पुढाकाराने संवाद दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते
या दौऱ्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील रहाटेवाडी तामदर्डी तांडूर सिद्धापूर बोराळे अरळी नंदुर डोनज भालेवाडी फटेवाडी तळसंगी इत्यादी गावांमध्ये गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले .या संवाद दौर्यामध्ये शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे तालुका संघटक श्रीशैल कुंभार तालुका उपप्रमुख अरुण मोरे महिला आघाडी तालुकाप्रमुख शिवकन्या सुतार शहर प्रमुख शारदाताई जावळे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते