मंगळवेढा / मदार सय्यद
------------------------------------
टँकरचे पाणी न घेता काटकसरीने पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्याचे हुन्नूर ग्रामपंचायत केला गौरव .चक्क दुष्काळामध्ये सुद्धा टॅंकरचे पाणी न घेता काटकसरीने पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्याचे हुन्नूर तालुका मंगळवेढा येथील ग्रामपंचायतीने गौरव करून सत्कार करण्यात आला हुन्नूर तालुका मंगळवेढा येथील देवमुत्या धोंडीबा पुजारी यांनी हुन्नूर परिसरामध्ये गेल्या महिन्याभरापासून टॅंकर सुरू आहे त्यांनी टॅंकरचे पाणी न घेता आपल्या आहे त्याच विहिरीतील पाणी काटकसरीने वापरून एक आदर्श निर्माण केला आहे चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून हुन्नूर येथील लोकनियुक्त सरपंच मनीषा मच्छिंद्र खताळ ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले भाऊसाहेब यांनी तातडीने प्रशासनाकडे टँकरचा प्रस्ताव घेऊन परिसरामधील व वाड्या-वस्त्यांवर टँकरचे पाणी वाटप चालू केली आहे हुन्नूर- भोसे या रस्त्यालगत असणारे शेतकरी धोंडीबा पुजारी यांनी आपल्या आहे त्या पाण्यात काटकसरीने वापर करून एक प्रकारचा पाणी बचतीचा संदेश दिला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हुन्नूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाचा गौरव करून सत्कार करण्यात आला यावेळी मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ, ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य सौदागर माने, अनिल होनमाने, संतोष कदम, जितेंद्र ठोकळे, सतीश जगदाळे, अशोक हेगडे ,राजू सुतार, युवराज तेलंग, विष्णू जगताप, खंडू भोसले, हनुमंत काटे, मायाप्पा पुजरी, मोहन चौगुले, शिपाई पांडुरंग शिंदे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते

यावेळी हुन्नूरच्या लोकनियुक्त सरपंच मनीषा मच्छिंद्र खताळ यांनी सांगितले की हुन्नूर परिसरामध्ये पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती असून असून परिसरातील ग्रामस्थांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे सांगितले