परिवहन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार - 'प्रहारचे' निवेदन - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, April 10, 2019

परिवहन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार - 'प्रहारचे' निवेदनपरिवहन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार - 'प्रहारचे' निवेदन 


  सोलापूर / प्रतिनिधी

---------------------------------

गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन कर्मचाऱ्यांनी अनेक यातना व प्रसंगाना सामोरे जात आपली नोकरी इमानदारीने करीत असताना कामगारांच्या पदरी मात्र निराशा आणि त्यांच्या कुटुंबाच्या पदरी यातनेशिवाय दुसरे काही मिळत नसल्याने कामगार आणि त्याच्या कुटूंबाची उपासमार , पगार , फंडाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने अनेक कामगारांनी व त्यांच्या कुटूंबातील काही व्यक्तीनी  आत्महत्या देखील केली . परंतु या परिवहन विभागात कार्यरत असणारे व्यवस्थापक आणि संबंधित चेअरमनपासून ते सदस्यपर्यंत तसेच महानगरपालिकेत कार्यरत असणारे शंभराहून जास्त नगरसेवक , विद्यमान आजीमाजी आमदार ,खासदार व मंत्रानी कोणत्याही प्रकारे या परिवहन विभागाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याने १९९२ पासून ते आजपर्यंत ( परिवहन व्यवस्थापक गजेंद्र मदने यांचा कार्यकाल वगळून ) कोणीही लक्ष दिले नाही तरी सुध्दा परिवहन कर्मचारी यानी आपल्या जीवाची व परीवारची कोणतेही पर्वा न करता आपली सेवा सामान्य नागरीकांच्या हीतासाठी आविरतपणे सुरू ठेवून  आपली सामाजिक बांधिलकी जोपसत आपली सेवा सुरू ठेवल्याने त्या सेवेला पगार न देता कलिमा फासन्याचे काम करू लागल्याने परीवहन कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय लोकसभेच्या मतदानावर ५००० मतदार बहिश्कार घालनार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आले .परिवहन कर्मचार्यना पगार मिळत नाही त्यांना व त्याच्या कुटूंबीयाना उपचारसाठी पैसे मिळत नाही. 

घरातील (लग्न कार्य ,शैक्षणिक , आरोग्य व इतर ) पूर्ण करावी लागतात . हे लोकशाहीला कलंकीत करणारी बाब असून चीड आणनारी असल्याचे प्रतिपादन प्रहारचे शहरसंघटक जमीर भाई शेख आणि सदर निवेदन देते वेळी व्यक्त केले .परिवहन सण २०१७-१८ मध्ये केलेले कार्य असतांना सुध्दा त्यांचा मागील ९ महिन्यातील पगार कोणतेही कारण नसताना सदरची कामगारांची पगार देणे बंधनकारक असताना सर्वोच्च न्यायालयात सदरची बाब अडकावुन ठेवण्याचे काम परीवहन व्यवस्थापक कार्यालय व महानगरपालिकेतील अधिकारी करीत असल्याने तसेच चालू महिन्यातील फेब्रुवारी आणि मार्च पगार अद्याप मिळाला नसल्याने येत्या लोकसभा निवडणूक आपण दि .१८ एप्रिल २०१९ परिवहन खात्यात काम करणारे ६०० कामगार आणि त्यांचे कुटुंब अंदाजे ५००० मतदानावर बहिष्कार घालनार आहे . यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या संजीवनी बारगुळे , शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी , शहर संघटक जमीर शेख , शहर कार्याध्यक्ष खालीद मणियार ,प्रहार परिवहन कर्मचारी संघटनेचे प्रमुख आर एन मकानदार , देवीदास गायकवाड , शाकिर उस्ताद ,विजु गायकवाड ,प्रभाकर बिजरकर , नागेश म्हेत्रे ,महादेव कुलकर्णी , विजय चौगुले यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते .

Pages