म्हैशाळ योजनेतील सहाव्या टप्प्यातील पाणी वीस वर्षानंतर मंगळवेढा दक्षिण भागातील हुन्नूर येथे दाखल - Pantnagari Times

Breaking News

Sunday, April 28, 2019

म्हैशाळ योजनेतील सहाव्या टप्प्यातील पाणी वीस वर्षानंतर मंगळवेढा दक्षिण भागातील हुन्नूर येथे दाखलम्हैशाळ योजनेचे पाणी वीस वर्षानंतर मंगळवेढा दक्षिण भागातील हुन्नूर येथे दाखल

हुन्नूर / प्रतिनिधी

तब्बल वीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठीच्या मंजूर केलेल्या म्हैसाळ योजनेचे पाणी तब्बल 20 वर्षानंतर आज सकाळी अखेर मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील हुन्नुर येथील ओढ्यात आल्यामुळे या भागातील शेतकय्रातून आनंद व्यक्त केला जात आहे.

या सीमावर्ती भागाचा सीमावर्ती भागातील दुष्काळी परिस्थिती हटवण्यासाठी दोन वितरिकेच्या माध्यमातून 6 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणाऱ्या या योजनेस युती शासनाच्या काळात म्हैसाळ योजनेस मंजुरी देण्यात आली. परंतु या योजनेचे पाणी येण्यासाठी तब्बल वीस वर्षांपेक्षा अधिक कालावधी गेला. परंतु या योजनेचे पाणी या भागातील शेतीला मिळाले नसल्यामुळे 2009 च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या भागातील जनतेने घेतला. त्यामुळे  या योजनेला निधी मिळावा म्हणून गती आली. या बैठकीसाठी निधी मिळावा यासाठी आमदार भारत भालके यांनी ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. परंतु सत्ता बदलानंतर सुरुवातीच्या काळात निधी मिळण्यास विलंब झाला.

प्रशांत परिचारक यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना या सुरू असलेल्या कामावर भेट देऊन हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. या योजनेसाठी पंतप्रधान सिंचन योजनेतून निधी उपलब्ध झाल्यामुळे या कामासाठी गती आली. परंतु यातील अडचणी लक्षात घेता हे पाणी त्यात दुष्काळात मिळावे म्हणून जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी थेट तलावात ठिय्या आंदोलन केले तब्बल आठ ते दहा दिवसाच्या आंदोलन तर प्रशासनाने पाणी देण्यात चालढकल केली. अखेर पुणे येथे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत आ.तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा बैठक घेऊन या योजनेपासून वंचित असलेल्या सहा या गावाचा समावेश करण्याबरोबर या गावांना दुष्काळी परिस्थितीत पाणी देण्याच्या सूचना संबंधित खात्याला देण्यात आल्यामुळे पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या पण पाणी कधी मिळणार याच्या प्रतिक्षेत या भागातील शेतकरी होते आज सकाळी नऊच्या दरम्यान यावर्षी सीमावर्ती भागात पाणी आले असून हे पाणी सध्या शिरनांदगी तलावाकडे मार्गस्थ झाल्याने या भागातील शेतकरी आणि दुष्काळ पाणी आल्यामुळे आनंदीत झाले आहेत.युती शासनाच्या सुरू झालेल्या या योजनेचा अखेर याच सरकारच्या काळात या योजनेचे पाणी येण्याचा मार्ग सुकर झाला.


या शेवटच्या टोकावर असलेल्या या भागाला पाणी पोहोचण्यात पाणी पोहोचण्यात आम्ही यशस्वी झाले असून या भागातील शेतीसह लोकांची तहान भागवणे पर्यंत पाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

- हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता कृष्णा खोरे महामंडळ

Pages