पाणी संघर्ष चळवळीच्या प्रयत्नामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात दाखल - प्रा शिवाजीराव काळुंगे - Pantnagari Times

Breaking News

Monday, April 29, 2019

पाणी संघर्ष चळवळीच्या प्रयत्नामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात दाखल - प्रा शिवाजीराव काळुंगे
पाणी संघर्ष चळवळीच्या प्रयत्नामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात दाखल - प्रा शिवाजीराव काळुंगे

मंगळवेढा / मदार सय्यद

----------------------------------

गेली २७ वर्ष सतत प्रयत्नवादी असणाऱ्या पाणी संघर्ष चळवळीमुळेच म्हैसाळ योजनेचे पाणी आज मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूरच्या ओढ्यात दाखल झाले आहे असे प्रतिपादन प्रा शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.

म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील ओढ्यात दाखल झाल्यानंतर त्याचे जलपूजन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, गेली २७ वर्षे तेरा दुष्काळी तालुक्यातील भागांना पाणी मिळावे म्हणून सातत्याने पाणी संघर्ष चळवळतील नेते व कार्यकर्त्यांनी ही पाणी संघर्ष चळवळ धगधगत्या अंगासारखी फुलवत ठेवली होती. या संघर्ष चळवळीमुळे मिरजचा पूर्व भाग, वाळवा, जत, आटपाडी, सांगोला या तालुक्यांना पाणी मिळाले होते. परंतु म्हैसाळ योजनेचे फक्त पाणी मंगळवेढा तालुक्यात मिळणे बाकी होते. खरेतर ही योजना मंगळवेढा तालुक्यात पूर्णत्वास आणण्यासाठी पद्मभूषण स्व. नागनाथअण्णा नायकवडी, सांगोल्याचे आमदार भाई गणपतराव देशमुख, स्व. निळू फुले, स्व. आर. आर. (आबा) पाटील, भारत पाटणकर, यांच्यासह तेरा दुष्काळी तालुक्यातील पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले होते. आज मंगळवेढा तालुक्यात जे म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाले आहे त्याचे खरे श्रेय हे पद्मभूषण स्व. नागनाथअण्णा नायकवडी, सांगोल्याचे आमदार भाई गणपतराव देशमुख, स्व. निळू फुले, स्व. आर. आर. (आबा) पाटील, भारत पाटणकर, पाणी संघाच्या चळवळीचे निमंत्रक वैभव नायकवडी यांच्यासह तेरा दुष्काळी तालुक्यातील पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्त्यांना जाते. गेली २४ वर्ष ही पाणी संघर्ष चळवळीची पाणी परिषद आटपाडी येथे होत होती परंतु मंगळवेढा तालुक्याला पाणी आणून देण्यासाठी यावर्षीची २५ वी रौप्य महोत्सवी पाणी परिषद मंगळवेढा घेण्यात आली. त्यादरम्यान आमदार गणपतराव देशमुख यांनी कृष्णा खोरे महामंडळ व राज्य सरकारने म्हैसाळ योजनेसाठी निधी द्यावा अशी मागणी या पाणी परिषदेदरम्यान केली होती. जर हा निधी नाही दिला तर महिनाभरात मंगळवेढा, सांगोला व जत तालुक्यातील शेतकर्‍यांना सोबत घेऊन म्हैसाळ साठी मोठी चळवळ उभा करीन असे सांगितले होते. त्यांच्या या मागणीचा विचार करून ही म्हैसाळ योजना राज्य शासनाने पूर्णत्वाकडे नेली. त्यामुळे आज मंगळवेढा तालुक्याला म्हैसाळचे पाणी मिळाले आहे. पिढ्यान पिढ्या ज्या माणसाचे आयुष्य पाण्याविना तडफडत दारिद्र्य झाली आणि दारिद्र्याने गांजत गेली. अशांची आयुष्य फुलावीत म्हणून माळरानावर जीवन गंगा यावी म्हणून पाणी संघर्ष चळवळीतील सर्वच नेते धडपडत राहिले आहेत. सतत पंचवीस वर्षे ही चळवळ चालू राहते हा अभूतपूर्व इतिहास आहे. चळवळीतून अनेक योजना मार्गी लागल्या गेल्या २५ वर्षाचा इतिहास पाहिला तर पाण्यासाठीची संघर्ष चळवळ अद्वितीय अशीच होती आता लोकजागर झाला असून एक चांगले संघटन उभे राहले त्यातून अस्तित्व निर्माण झाले आहे. याच अस्तित्वाने व्यवस्थेला धक्के देते व दखल घेण्यास भाग पाडले त्याचाच भाग म्हणजे आज हुन्नूरच्या ओढ्यात पाणी आले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी दक्षिण भागातील नेते भिवा दोलतडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

या जलपूजन प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ऍड राहुल घुले, हुन्नूरचे सरपंच मच्छिंद्र खताळ, काका मिसकर, वसंत गरंडे, रामा खोपे, अंकुश खताळ, नारायण शिंदे, राजू पाटील, गुलाब माने, विजय साळुंखे, रावसाहेब कोरे, शिवाजी लांडगे, शंकर माने, तम्मा चौगुले, मारुती भूसनर, शहाजी सूर्यवंशी, शिवाजी लेंगरे, बिरा रेवे, दत्ता जाधव, ज्ञानेश्वर फटे, ब्रह्मदेव कुंभार, बाळासाहेब आमुने, नामदेव जाधव, सुरेश हत्तीकर, मधुकर सूर्यवंशी, जालिंदर जावीर, नाना कटारे, धनाजी निकम, जिवाप्पा पुजारी 

यांचेसह मानेवाडी, रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, मारोळी, भोसे, शिरनांदगी, चिक्कलगी, निंबोनी व जंगलगी या भागातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Pages