म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्याच्या हद्दीत दाखल प्रामाणिक प्रयत्नाला आले यश... शैला गोडसे - Pantnagari Times

Breaking News

Sunday, April 28, 2019

म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्याच्या हद्दीत दाखल प्रामाणिक प्रयत्नाला आले यश... शैला गोडसे


म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्याच्या हद्दीत दाखल प्रामाणिक प्रयत्नाला आले यश... शैला गोडसे

मंगळवेढा  / प्रतिनिधी

म्हैसाळ योजनेचे पाणी शेवटच्या टोकाला असलेल्या आणि सातत्याने दुष्काळ ग्रस्त असलेल्या मंगळवेढा तालुक्याला मिळणार म्हणून गेली तीस वर्षे या भागातील शेतकरी चातकासारखी पाण्याची वाट बघत होता या भागातील नेते मंडळी आश्वासनावर आश्वासने देत होती परंतु पाणी काही केल्या येत नव्हते त्यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी येईल यावर या भागातील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला होता

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यांमध्ये सुमारे 600 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्यात येणार आहे आहे परंतु या योजनेची मंगळवेढा भागातील कालव्याची कामे जरी अपूर्ण असली तरी म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा मध्ये येऊ शकते  असा विश्वास या भागातील शेतकऱ्यांना देण्यासाठी तालुक्यातीलच शिरनांदगी तलावामध्ये पाणी सोडावे अशी आग्रहाची मागणी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ शैला गोडसे यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने केली होती  परंतु प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे ध्यानात आल्यानंतर सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आमदार तानाजीराव सावंत  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुका शिवसेनेच्यावतीने शिरनांदगी तलावा मध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले होते हे ठिय्या आंदोलन सुमारे सात दिवस चालले एक महिला पदाधिकारी म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावांमध्ये सोडण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात रात्रंदिवस दुर्गम भागातील तलावांमध्ये आपला मुक्काम ठोकून आपल्या निवडक शिवसैनिकांसह आंदोलन करीत आहे प्रशासनाच्या विरोधात पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत या घटनेची दखल मंत्रालय स्तरावर मंत्रीमहोदयांनी घेतली आणि तात्काळ पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे म्हैसाळ योजनेचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट दिली आणि पाणी सोडण्याचे आश्वासन देऊन आंदोलन स्थगित केले त्यानंतर या अधिकाऱ्यांनी पाणी सोडले परंतु हे पाणी शिरनांदगी तलावांमध्ये पोहोचू शकले नाही तरीसुद्धा

शैलाताई गोडसे यांनी  हार मानली नाही त्यांनी पाण्यासाठीचा आपला संघर्ष आमदार तानाजीराव सावंत लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ठेवला प्रसंगी प्रशासनाबरोबर संघर्ष केला म्हैसाळ योजनेचे  पहिल्या पाणी पाळी चे पाणी बंद झाले असले तरी दुसऱ्या पाणी पाळी मध्ये म्हैसाळचे पाणी शिरनांदगी तलावात मंगळवेढ्याच्या हद्दीमध्ये आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा पवित्रा शैलाताई नी घेतला 

 आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली  शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिष्टमंडळासह शैला गोडसे यांनी राज्यमंत्री  माननीय श्री विजय बापू शिवतारे यांची समक्ष भेट घेऊन निवेदन दिले आणि तातडीने म्हैसाळ योजनेच्या  अधिकाऱ्यांसह बैठक लावण्याची आग्रहाची मागणी करण्यात आली त्यानुसार दिनांक .27 फेबुवारी ..2019...रोजी मंत्रालयामध्ये जलासंपदा मंत्री महोदय यांच्या दालनात आमदार तानाजीराव सावंत लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील प्रा.शिवाजी सावंत संभाजीराव शिंदे हे यांच्या व सलगर उपसंरपच रामचंद्र जाधव येळवी संरपच सचिन चव्हाण  आसबेवाडी संजय नागणे रमेश आसबे शिवणगी जकण्णा सोमुते.सोड्याडी संरपच शांताप्पा बिराजदार मा.संरपच भागवत भुसे लंवगी मदन घाटगे भाऊ जाधव भागातील शेतकरी  प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळासह म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये  आमदार तानाजीराव सावंत यांनी जर म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्याला दिले नाही  तर म्हैसाळ योजनेचे पंप हाऊस पेटवून देण्यात येईल अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मंत्रीमहोदयांच्या समक्ष म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्याच्या शिरनांदगी तलावांमध्ये 15 एप्रिल ते एप्रिल अखेर  दुसऱ्या पाणी पाळीच्या वेळेस  सोडण्याचे आश्वासन म्हैसाळ योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते त्यानुसार प्रशासनाने शिरनांदगी तलावात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे

मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार अधिकाऱ्यांनी आपला शब्द पाळला असून या भागांमध्ये टंचाईच्या परिस्थितीमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात येत असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमधून कष्टकर्‍या मधून समाधान व्यक्त केले जात आहे या पाण्याची पाहणी जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केली त्यावेळी तालुका प्रमुख तुकाराम कुदळे उपशहरप्रमुख सतिश शिर्के, दत्ता माने सुरेश नरळे विनोद कदम महिला आघाडी तालुका संघटक आरती बसंवती अर्चना भालेराव हुन्नूर ममदाबाद शिरनांदगी भागातील शिवसैनिक शेतकरी उपस्थित होते.

_______________

गेली ३० वर्षे येथील शेतकरी म्हैसाळच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. मात्र पाण्याच्या जीवावर राजकारण करणाºयांनी ते पाणी कधी येणार? कसे येणार? याविषयी कायम शेतकºयांना अंधारात ठेवले. मात्र शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत यांनी मंत्रीमंडळ स्तरावर केलेला सततचा पाठपुरावा, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाºयांना दिलेले आदेश  यामुळे अधिकाºयांनी म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्यासाठी सोडण्यास सुरूवात केली असून हा सर्वसामान्य शेतकºयांचा विजय आहे. यामुळे त्यांच्याच हस्ते जलपूजन करण्याचा आपला मानस आहे.

- शैला गोडसे

झेडपी सदस्या


Pages