हुन्नूर / प्रतिनिधी
हुन्नूर ता. मंगळवेढा येथे चारा छावणी सुरू झाल्याने परीसरातील शेतकऱ्यामधून समाधान व्यक्त होत असल्याचे प्रतिपादन हुन्नूर चे सरपंच मच्छिंद्र खताळ यांनी व्यक्त केले
राज्य शासनाकडून नूर येथील बिरोबा अन्नछत्र मंडळ ला चारा छावणीची परवानगी मिळाली हा असून चारा छावणीचे उद्घाटन तनाळी येथील रत्नाकर महाराज मठाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष व माजी उपसरपंच राजू पुजारी, दामाजी कारखान्याचे माजी संचालक तम्मा काका चौगुले, रेवेवाडी चे माजी सरपंच जगन्नाथ रेवे, ममदाबाद चे माजी सरपंच यशवंत होळकर, माजी सरपंच ज्योतिबा पुजारी, ह भ प. सुदर्शन महाराज, ब्रह्मदेव रेवे, बि .टी पुजारी, रावसाहेब कोरे, बाबा आमुंगे, पिंटू पुजारी, सौदागर माने, अण्णाप्पा सरगर, सोपान घाडगे, बिरु घाडगे, मच्छिंद्र पुजारी, सागर खताळ, किरण पाटोळे, गजानन भोसले, गाव कामगार तलाठी डी.बी. मोरे, कोतवाल विजय चव्हाण, आदी उपस्थित होते