हुन्नूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन - Pantnagari Times

Breaking News

Monday, April 15, 2019

हुन्नूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
 मंगळवेढा / मदार सय्यद

-------------------------------------

हुन्नूर ता. मंगळवेढा येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेवेवाडीचे ग्रामविकास अधिकारी सिकंदर इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले मूलमंत्र शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा, या मुल मंत्राचे आपण आचरण करावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येकाला सांगण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी उपसरपंच प्रविंकुमार साळे हुन्नरचे ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले, भाऊसाहेब कृषी सहाय्यक  अमितकुमार शिंदे, माजी सरपंच शशिकांत काशीद, माजी उपसरपंच राजाराम पुजारी, माजी ग्रामपंचायत सदस्य तुशांत माने, गुलाब माने, आर के कोरे, संतोष क्षीरसागर, भगवान कटरे सर, मायाप्पा धुलगुडे सर, आनंदा माने, जितेंद्र ठोकळे, विकास पुजारी, किरण पाटोळे, अप्पासाहेब जगदाळे, किसन हेगडे, बंडू गुरव, दत्ता ऐवळे, पांडुरंग शिंदे, आदी उपस्थित होते

Pages