हुन्नूर परिसरामधून प्रेमल बन्सीलाल खडतरे या महिलेचे कौतुक
मंगळवेढा / मदार सय्यद
---------------------------------
हुन्नूर ता. मंगळवेढा येथील सेवानिवृत्त गाव कामगार तलाठी मनोहर खडतरे भाऊसाहेब यांच्या सून प्रेमल बन्सीलाल खडतरे, ही महिला गरोदर होती दिनांक 18 एप्रिल रोजी मतदान दिवशी आपले राष्ट्रीय कर्तव्याची जाण आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा हे मनाशी बाळगून होती प्रेमल खडतरे ही महिला गरोदर होती तिला नऊ महिने पूर्ण झाले होते. सेवानिवृत्त गावकामगार तलाठी मनोहर खडतरे भाऊसाहेब यांनी आपली पत्नी सुरेखा मनोहर खडतरे, सून प्रेमल बन्सीलाल खडतरे, मुलगा बन्सीलाल मनोहर खडतरे, व मुलगी मधुमती सुनील खाडे, यांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजवायला सांगितला. त्यानंतर सर्व घरच्या मंडळींनी हुन्नूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्या गरोदर महिलेस डॉक्टर शरद शिर्के यांच्या सत्यसाई हॉस्पिटल मंगळवेढा येथे त्या महिलेची प्रसूती झाली व एक गोंडस मुलीला जन्म दिला असून परिसरांमधून तिच्या या कार्याचे कौतुक होत आहे