धाडसी निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे.... शैला गोडसे - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, April 16, 2019

धाडसी निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे.... शैला गोडसेधाडसी निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे.... शैला गोडसे


मंगळवेढा / प्रतिनिधी

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या वतीनेआयोजित केलेल्या गावा गावातील ग्रामस्थांशी संवाद दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ शैला गोडसे या जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यावरून जात असताना कॉलेजचे विद्यार्थी असोत महिला असोत किंवा शेतकरी असोत त्यांच्याशी संवाद साधून धाडसी निर्णय घेऊन भारत देशाला जगाच्या पटलावर नेऊन ठेवणाऱ्या मोदी सरकारची पुन्हा एकदा गरज असून त्यासाठी महायुतीचे उमेदवार यांना मतदान करावे अशी आग्रहाची भूमिका शिवसेनेच्या वतीने मांडताना दिसत आहेत

शैला गोडसे या जिल्हा परिषद सदस्य असून  शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आहेत तरीसुद्धा त्या एका सामान्य कार्यकर्त्या प्रमाणे वेगवेगळ्या गावातील जनतेशी संवाद साधत असल्यामुळे एक वेगळाच चर्चेचा विषय झाला असून त्याचा निश्चितच फायदा महायुतीच्या उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाही असे मत खाजगीमध्ये या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत

एखादे काम हातात घेतले की ते काम मन लावून करायचे आणि तडीस न्यायचे हा शैला गोडसे यांचा गुणधर्म आहे मग त्यासाठी कितीही कष्ट घ्यायची तयारी त्यांची असून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्या मनापासून काम करताना दिसत आहेत

सोमवारी त्यांनी मंगळवेढा भागातील ब्रह्मपुरी बठान उचेठाण शरद नगर तसेच पंढरपूर भागातील सिद्धेवाडी खर्डी तनाळी तपकिरी शेटफळ कोर्टी उंबरगाव बोहाळी लक्ष्मी टाकळी वाखरी शिरढोण कवठाळी इत्यादी गावातील ग्रामस्थांशी प्रचाराच्या निमित्ताने संवाद साधला यावेळी शिवसेना महिला आघाडी पंढरपूर तालुकाप्रमुख आरती बसवंती अर्चना भालेराव सुग्रीव पाटील ताजुद्दीन मुजावर अविनाश पाटील त्यादी संवाद दौर्‍यामध्ये उपस्थित होते

Pages