अनपेक्षित भेट प्रकाश आंबेडकर , सुशीलकुमार शिंदे
सोलापूर / प्रतिनिधी
--------------------------
बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची आज सकाळी बालाजी सरोवर येथे अचानक अनपेक्षित भेट झाली. प्रकाश आंबेडकर हे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह नाश्ता करत असताना सुशीलकुमार शिंदे याच वेळी बालाजी सरोवर येथे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यास आले होते प्रकाश आंबेडकर येथेच बसले आहेत म्हटल्यावर त्यांनी तिथे जाऊन भेट घेतली दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या अर्थात राजकारण हा विषय झाला नाही अवघ्या काही मिनिटाचा हा प्रसंग होता असं सांगण्यात आलं