गेल्या सत्तर वर्षात राजकारणात प्रस्थापित असणाऱ्या व्यवस्थेने आमचा अपमान केला आहे -गोपीचंद पडवळकर - Pantnagari Times

Breaking News

Friday, April 12, 2019

गेल्या सत्तर वर्षात राजकारणात प्रस्थापित असणाऱ्या व्यवस्थेने आमचा अपमान केला आहे -गोपीचंद पडवळकरगेल्या सत्तर वर्षात राजकारणात प्रस्थापित असणाऱ्या व्यवस्थेने आमचा अपमान केला आहे -गोपीचंद पडवळकर 

  मंगळवेढा /मदार सय्यद

गेल्या सत्तर वर्षात राजकारणात प्रस्थापित असणाऱ्या व्यवस्थेने आमचा अपमान केला आहे. त्यामुळे या व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला असून, लाखो लोक यामध्ये सामिल होत आहेत. त्याचे कारण म्हणजे प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात लोकांच्या मनात धग आहे. ही निवडणूक सुशीलकुमार शिंदे किंवा महाराजांच्या विरोधात नसून, ही निवडणूक विचारांची आहे. विचारांची निवडणूक विचारांनी जिंकायची आहे असे प्रतिपादन वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले.'गावगाडयांचे जुने विचार बाजूला ठेऊन नवीन विचार वंचित आघाडीना द्या लोकसभेची ह्या निवडणूकीत वंचित आघाडीला कुठला धर्म व जात नाही जो खासदार शेतकऱ्याच्या व देशाच्या हिताची बाजू मांडण्यासाठी लोकसभेत पाठवून द्या ' जिनकी जितनी संख्या भारी ,उतनी उनकी भागिदारी !

यापुढे दांडाही आपला ,झेंडाही आपला ,अन नेताही आपला

असे मत गोपीचंद पडळकर यांनी केले.मंगळवेढा येथे आठवडा बाजार मैदानात ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ जाहीर मेळावा प्रसंगी बोलत होत

यावेळी प्रा. दत्तात्रय खड़तरे यांनी मनोगत व्यक्त केले. भारीप जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे,वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.धम्मपाल माशाळकर,ऍड अरुण जाधव ,जिल्हा महासचिव श्रीशैल गायकवाड,नाना कदम, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड, वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हाध्यक्ष विक्रांत गायकवाड, तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रा महादेव ढोणे , महासचिव अशोक माने,सत्यवान सोनवले ,अनिल सोनवले, ध्यानेश्वर गरंडे, अशोक सोनावणे, अमित भुइगळ, दामाजी सरगर,अनंता वाघमारे,संजय वाघमोड़े,विकास दुधाल, अंकुश जानकर,शहराध्यक्ष सोमनाथ ढावरे,युवक तालुकाध्यक्ष सुनिल शिंदे,युवक शहराध्यक्ष अशोक जाधव,तानाजी चौगुले ,सचिव संजय सरवदे,सुनील वाघमारे, अमिर काझी,महिलाअध्यक्ष वैशाली सावंत, वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्ष उषा चव्हाण, तालुका महासचिव निकिंता सोनवने,उपाध्यक्ष लक्ष्मी ससाने आदी उपस्थित होते.

पडळकर म्हणाले की ' ही निवडणूक विचाराची आहे सर्व बहुजन वंचितानी अड़ बाळासाहेबाचे साथ देऊन संसदेत पाठवा आजपर्यंत आपण सर्वानी हालगी वाजवायाची , फटाके उड़वायाचे , झेंडे लावायाची, सतरंजी उचलायाची अशी अनेक कामे निवडणुकीत करत आलो आहे परंतु ह्यावेळीस सतरंजी आपणच हतारायची व आपणच बसायच ही भूमिका वंचिताची असेल आज संघर्ष करा उद्याचा मंगलवेढाचा ही आमदार वंचित आघाडीचा असेल व वंचिताना विचारल्याशिवाय राज्यात कोणीही आमदार होऊ शकत नाही अशी ही वंचिताचीआघाडी बाळासाहेबांनी केली आहे.'

यावेळी सूत्रसंचालन अँँड़ अरुण जाधव यांनी तर आभार प्रा.महादेव ढोणे यांनी केले.

Pages