समाधान आवताडे यांच्या प्रयत्नामुळे मानेवाडी येथील मानेबाबा देवस्थान क वर्ग तीर्थक्षेत्रास मंजुरी
मंगळवेढा / प्रतिनिधी
----------------------------
मानेवाडी तालुका मंगळवेढा येथील श्री क्षेत्र माने बाबा देवस्थानासाठी 30 लाख रुपये मंजूर झाले असून क वर्ग तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाल्याने दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाबद्दल भाविक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अशी माहिती मानेवाडी चे सरपंच दत्ताभाऊ माळगे यांनी दिली
गावातील लोकांच्या मागणीनुसार चेअरमन समाधान आवताडे यांनी या देवस्थानच्या विकासासाठी राज्य सरकारकडे क वर्ग देवस्थान दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले होते
क वर्गात समावेश झाल्याने या देवस्थानच्या विकासासाठी तीस लाख रुपयांचा निधी मिळणार असून यातून मंदिर परिसर सुशोभीकरण पुरुष व महिलांसाठी भक्तनिवास शौचालय वाहनतळ हायमास्ट दिवे संरक्षक भिंत जोडरस्ता या सुविधा मिळणार असल्याने या कामामुळे भाविक भक्त आनंदित झाले आहेत मानेवाडी गावचे हे ग्राम दैवत असल्याने गावातील लोकांची मोठी श्रद्धा या देवस्थानावर आहे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील हजारो लोक या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेटी देत आहेत आता या मंदिराला क वर्ग मिळाल्याने मंदिर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
------------------
मंगळवेढा तालुक्यातील मानेवाडी गावचे ग्रामदैवत या मानेबाबा देवस्थानाला तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश व्हावा म्हणून सर्व भावीक भक्ता मधून व ग्रामपंचायत च्या वतीने पुरवठा करण्यात येत होता याची दखल घेत श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी वेळोवेळी पाठ पुरवठा करून महाराष्ट्र शासनाकडून तीर्थ-क्षेत्र विकास आराखड्यातून क वर्गा मधून 30 लाख रुपये चा विकास निधी मिळवून दिल्याबद्दल भाविक भक्ताकडून व मानेवाडी ग्रामस्थां मधून समाधान व्यक्त होत आहे
दत्ताभाऊ मळगे
सरपंच ग्रामपंचायत मानेवाडी ता.मंगळवेढा