जनतेच्या प्रश्नासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा - शैला गोडसे - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, March 5, 2019

जनतेच्या प्रश्नासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा - शैला गोडसे


जनतेच्या प्रश्नासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा - शैला गोडसे

मंगळवेढा तालुक्यामध्ये विविध ठिकाणी शिवसेना शाखेचे उद्घाटन


मंगळवेढा / प्रतिनिधी

 मंगळवेढा - पंढरपूर मतदारसंघातील जनतेच्या अडचणी सोडवताना वेळ पडली तर झेल भोगण्यासाठी सुद्धा तयार आहे असे प्रतिपादन शिवसेना नेत्या शैला गोडसे यांनी बोराळे येथे केले तालुक्यातील बोराळे, भोजने वस्ती, तांडोर, सिध्दापुर या विविध गावच्या शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी त्या बोलत होत्या पुढे बोलताना गोडसे म्हणाल्या की मंगळवेढा उपसा सिंचन योजना गेल्या अनेक दिवसांपासून रखडत चालली आहे योजना सुरु व्हावी म्हणून शिवसेनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आलेला आहे.

 त्या ज्वलंत पाणी प्रश्नांवर आत्ता पर्यंत प्रत्येक जनाने राजकारण करुण पदे मिळवली पंरतु शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला त्याचबरोबर बोराळे भागातील उजव्या कालव्याची परिस्थीती सुद्धा तशीच आहे या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमीन हस्तगत करुन शेतीसाठी पाण्याची सोय करतो म्हणून फसवले व या शेतकऱ्यांना आपल्या हक्का पासुन वंचित ठेवण्यात आले प्रत्येक वेळी बोलघेवड्या सारख्या थापा मारुन या भागातील अशिक्षित शेतकर्‍यांना फसवण्याचै काम आज पर्यंत प्रस्थापितांनी केले पण येथुन पुढे शिवसेना असे होऊ देणार नाही जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडुन समाज्याला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असेल जनतेच्या विविध अडचणी सोडवत असताना प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहे वेळच पडली तर जनतेसाठी झेल भोगायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे या मतदारसंघातील जनतेने आपल्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि  शिवसैनिकांनी सुद्धा  पुढाकार घ्यावा असे त्या म्हणाल्या. यावेळी माजी शिवसेना तालुकाप्रमुख गणेश गावकरे, तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे, जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने, मंगळवेढा शहराध्यक्ष सुनिल दत्तु, श्रीशैल कुभांर, आण्णा भोजने, अरुण मोरे,विजय कलुभर्मे, बंडू गायकवाड, समाधान मुगंसे, विनायक शिर्के, अमर चेळेकर, सचिन वडकिले, विशाल इंगळे,बाबु सरवळे, निखिल कुलकर्णी, रामभाऊ आवताडे, धनाजी गावकरे, प्रकाश भोजने, सुरज नकाते, आदी पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Pages