आमदार भालके यांच्या वाढदिवसाच्या औचित्यने दोनशे चष्म्यांचे वाटप .
मंगळवेढा / प्रतिनिधी
आ भारत भालके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांच्या जगदंब परिवाराने दोनशे नागरिकांना चष्म्यांचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामाजी शुगर चे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र वाकडे होते यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड धनंजय खवतोडे रामचंद्र वाकडे मनोहर कलुबर्मे काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर शहराध्यक्ष मारुती वाकडे .ॲड सुजित कदम बाबा कोंडूभैरी ज्ञानेश्वर भगरे नगरसेविका सबजपरी मकानदार महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष अंजली मोरे शहराध्यक्ष राजश्री टाकणे प्रवीण खवतोडे पांडुरंग नाईकवाडी व्यासपीठावर उपस्थित होते .शहरातील गणेश बागेसमोर असणाऱ्या नगरपालिकेच्या शाळेत 10 फेब्रुवारी रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात साडेसहा हजार रुग्णांची वेगवेगळ्या आजारावरील तपासणी झाली यावेळी डोळ्यांची मोफत तपासणी केली गेली होती या तपासणीत हजारपेक्षा जास्त रुग्णांना रुग्णांना डोळ्यांच्या समस्या होत्या त्यांना चष्मे वाटप करण्यात येणार होते यासाठी सदर रुग्णांची नावे व त्यांच्या डोळ्यांचे नंबर नमूद करून त्यांना आवश्यक असणारे चष्मे बनवून सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त सदर दोनशे रुग्णांना आ. भारत भालके यांच्या हस्ते संपर्क कार्यालयात या चष्म्यांचे वाटप करण्यात आले

प्रास्ताविकात भीमराव मोरे यांनी समाजामध्ये अनेकांचे वाढदिवस साजरे होतात मात्र गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी आरोग्य शिबिर यासारखे कार्यक्रम आयोजित करून वाढदिवसासाठी शुभेच्छा घेणारे उपक्रम राबवणारे परिवार फार कमी असतात असे सांगितले. या कार्यक्रमास भारत नागणे शंकर माळी मुरलीधर दत्तू महादेव जाधव. हर्षराज बिले.माजी सभापती संभाजी गावकरे .नगरसेवक राहुल सावजी.जनार्दन डोरले काँग्रेस युवक अध्यक्ष महेश दत्तू युवक तालुकाध्यक्ष युवराज शिंदे अड मनिष मर्दा सुनिता अवघडे काळुबाई अवघडे दादा टाकणे विनायक दत्तू नागेश भगरे. विकी भगरे रमिजराजा मुल्ला संदिप फडतरे चंद्रकांत काकडे अशोक गुंगे रवी घुले कुलदीप जाधव भीमदेव माळी दयानंद दत्तू अक्षय भगरे समाधान हेंबाडे विक्रम शेंबडे गणेश धोत्रे मुजम्मिल काझी अविराज अवताडे प्रवीण गुंगे किरण घोडके सोमनाथ बुर्जे मंगेश मोरे अशोक माने अजित यादव आदी जण उपस्थित होते आभार संदीप घुले यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदंब परिवार यांनी परिश्रम घेतले.