पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांना शासनाकडून विशेष सेवापदक बहाल
मंगळवेढा / प्रतिनिधी
--------------------------------
मंगळवेढा पोेलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी नक्षलग्रस्त भागात दोन वर्षे उत्तम सेवा केल्याप्रकरणी विशेष सेवापदक त्यांना शासनाकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी हे मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील निमशेगाव येथील असून ते सन 2013 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झाली. नक्षलग्रस्त विभागात त्यांनी उत्तम कामगिरी केल्याने याची शासनाने दखल घेवून त्यांना विशेष सेवा पदक मंजुर करण्यात आले आहे. सन 2017 पासून ते मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
राज्यातील जवळपास 88 पोलीस कर्मचार्यांना शासनाने विशेष सेवा पदक देवून त्यांना गौरविण्यात आले आहे. पुजारी यांनी नक्षलग्रस्त भागात तत्कालीन पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले होते. माचणूर येथील प्रतिक शिवशरण याच्या नरबळी प्रकरणात तपासामध्ये चांगले काम केल्याबद्दल पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पुजारी यांचे प्रशस्तीपत्र देवून अभिनंदन केले होते. पोलीस उपनिरीक्षक पुजारी यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक अनिल गाडे तसेच अन्य कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.