धनश्री परिवाराच्यावतीने मंगळवेढा येथे आज गुणवंतांचा व पुरस्कार्थींचा सत्कार सोहळा - Pantnagari Times

Breaking News

Saturday, March 23, 2019

धनश्री परिवाराच्यावतीने मंगळवेढा येथे आज गुणवंतांचा व पुरस्कार्थींचा सत्कार सोहळाधनश्री परिवाराच्यावतीने मंगळवेढा येथे आज गुणवंतांचा व पुरस्कार्थींचा सत्कार सोहळा


  मंगळवेढा / प्रतिनिधी

धनश्री परिवाराच्यावतीने मंगळवेढा येथे शनिवार दि. 23 मार्च रोजी सायं ५ वा. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मंगळवेढा येथे तालुक्यातील विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा तसेच यूपीएससी, एमपीएससी परीक्षेत यश प्राप्त करून विविध पदावर नियुक्त झालेल्या गुणवंतांच्या गौरवार्थ त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी दिली आहे.


 सत्कार समारंभ जलतज्ञ व कृषीतिर्थ मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांच्या हस्ते व जकराया शुगरचे चेअरमन ॲड. बिराप्पा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी महाराष्ट्र शासन कृषिभूषण पुरस्कार प्राप्त अंकुश पडवळे, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विरेंद्र राक्षे, महाराष्ट्र शासन कृषीसेवारत्न पुरस्कार प्राप्त रामचंद्र आलदर, पुणे विभागीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्राप्त राकेश गायकवाड, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांचे तर्फे उपक्रमशील शिक्षिका म्हणून राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त उषा कोष्टी यांचेसह स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केलेले बावची येथील वनसेवा अधिकारी श्रीकांत खांडेकर, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी विनायक जगताप व मंदोदरी वाकडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, १६ वी राष्ट्रीय ज्युनियर अथेलेटिक्समधील रौप्यपदक विजेती श्रद्धा हाके, आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर भगरे,जनकल्याण परिवार आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्राप्त वारी परिवार मंगळवेढा आदींचा यावेळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.   यादरम्यान जलतज्ञ सुधीर भोंगळे हे आधुनिक शेती व पाणीविषयक मार्गदर्शन करणार आहेत. तरी याप्रसंगी मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही धनश्री परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Pages