मंगळवेढा-पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या - Pantnagari Times

Breaking News

Friday, March 22, 2019

मंगळवेढा-पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्यापत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या

  मंगळवेढा - प्रतिनिधी

मंत्रालयात सचिवपदावर कार्यरत असलेले विजयकुमार भागवत पवार (50) यांनी पत्नीवर गोळीबार केल्यावर स्वत: आत्महत्या केली. या गोळीबारात त्यांची पत्नी जखमी झाली. पवार यांच्या पत्नीवर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असलेले विजयकुमार भागवत पवार हे मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत होते. कौशल्य विकास विभागात ते कार्यरत होते. पवार हे मंगळवेढ्यातील घरी आले होते. विजयकुमार भागवत कुमार यांचा गुरुवारी रात्री पत्नीशी वाद झाला होता, असे समजते. या पार्श्वभूमिवर त्यांनी पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या आणि यानंतर घरात गळफास घेत आत्महत्या केली. गोळीबारात त्यांची पत्नी जखमी झाली असून, त्यांच्यावर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या पत्नीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

विजयकुमार भागवत पवार आणि त्यांच्या पत्नीमध्ये नेमका काय वाद होता, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा पोलिस तपास करत आहे.

Pages