आमदार भारत भालके यांच्या उपस्थितीत खिदमत चॅरिटेबल संस्था, च्या वतीने १७५ मुलांचे मोफत खतना(मुंज )कॅम्प संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Sunday, March 17, 2019

आमदार भारत भालके यांच्या उपस्थितीत खिदमत चॅरिटेबल संस्था, च्या वतीने १७५ मुलांचे मोफत खतना(मुंज )कॅम्प संपन्नमंगळवेढा:--

    खिदमत चॅरिटेबल संस्था,मंगळवेढा च्या वतीने आमदार भारत भालके यांच्या अध्यक्षतेखाली १७५  मुलांचे मोफत खतना(मुंज )कॅम्प संपन्न:--

     खिदमत चॅरिटेबल संस्था, मंगळवेढा या संस्थेने उर्दू शाळा मंगळवेढा येथे १७५ मुलांचे मोफत खतना(मुंज)  कॅम्प चे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भारत भालके हे होते,सदर कार्यक्रमास  सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे,मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित जगताप,पांडुरंग कोळी, नगरसेवक,बशीर बागवान, नगरसेवक, पिनू कोंडुभैरी, नगरसेवक,मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल चे तालुका अध्यक्ष नजीर इनामदार, मंगळवेढा शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेल चे अध्यक्ष रशीद तांबोळी, मंगळवेढा तालुका काँग्रेसचे  प्रसिद्धी प्रमुख अशोक माने,मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बिलाल बागवान,डॉ उजेर बेग, रमीजराजा मुल्ला,दादा टाकणे, सुभाष भंडारे,जावेद दरवाजकर,हसन  बागवान, अलताफ सुतार, आदम शेख,रावसाहेब फटे उपस्थित होते

   यावेळी आमदार भारत भालके यांनी डॉ.उजेर बेग,सोलापूर यांचा सत्कार केला आणि आमदार भारत भालके यांचा नजीर इनामदार यांनी केला.

  या वेळी आमदार भारत भालके म्हणाले, खिदमत चॅरिटेबल संस्था  यांचे कार्य  कौतुकास्पद असून तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थितीमुळे गोरगरीब मुस्लिम बांधवाना या कॅम्प चा फायदा होणार आहे.या संस्था मधील सर्व पदाधिकारी यांचे आभार मानून या पुढील काळात खिदमत चॅरिटेबल संस्थेच्या सामाजिक कार्यास सर्व प्रकारची मदत करणार आहे खतमा कॅम्प ला शुभेच्छा दिल्याआणि

अमन वसीम बागवान या मुलास आमदार भारत भालके यांच्या हस्ते स्लिप देऊन कॅम्प सुरू करण्यात आला. सदर खतना कॅम्प साठी मंगळवेढा,पंढरपूर, मोहोळ,जत तालुक्यातील हुन्नूर,ल.दहिवडी, सिद्धापूर, घरनिकी,नंदूर, अरळी,आधळगाव,खुपसंगी,खर्डी,कोर्टी,गुरसाळे,   कासेगाव,आंबेचिंचोली, पुळुज,वायफळ आदि गावामधून १७५ मुलांना खतना(मुंज)करण्यात आले.संस्थेच्या वतीने सर्वासाठी चहा,अल्पोपहार ची सोय केली होती.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नजीर इनामदार, रशीद तांबोळी, जावेद दरवाजकर, युसुफ बागवान,बिलाल बागवान, आरिफ खतीब, रमीजराजा मुल्ला, आदम शेख, इरफान बागवान, जमीर इनामदार, इंनुस बागवान, इरफान मुजावर, जब्बार आतार, तस्लिम आकुंजी,जलाल मुल्ला,विनायक रजपूत फारूक खतीब, राजू आतार ,मीरा सुतार,वसीम बागवान आदि नी  परिश्रम घेतले

कार्यक्रमाचे सूत्र संचलन जमीर इनामदार यांनी केले व आभार रशीद तांबोळी यांनी मानले

Pages