
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन
पणजी / प्रतिनिधी
-------------------------------
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आहे. रात्री अडीच वाजताच्या सुमारास त्यांचा रक्तदाब कमालीचा कमी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. ते ६४ वर्षांचे होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मनोहर पर्रीकर यांच्या निधनाबाबत Twitter व्दारे माहिती दिली.
पर्रीकर हे स्वादुपिंड्याच्या आजाराने गेले वर्षभर आजारी होते. अमेरीकेत, मुंबईत आणि दिल्लीतही त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यांनतर गेले चार महिने ते घरीच उपचार घेत होते. मध्यंतरी त्यांच्या फुफ्फुसात पाणी झाल्याने त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला होता. पर्रीकर पहिल्यांदा १९९४ मध्ये गोवा विधानसभेवर निवडून गेले होते. ते जून ते नोव्हेंबर १९९९ या काळात विरोधी पक्ष नेते होते.
ऑक्टोबर २००० मध्ये ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. मोदी यांच्या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्रीही (२०१४-१७) होते. मात्र ते केंद्रात फार काळ रमले नाहीत . मार्च २०१८ मध्ये ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री बनले होते.