गोव्यात काँग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा, भाजप सरकार अल्पमतात
पणजी / प्रतिनिधी
गोवा विधानसभेत भाजपचे सरकार बहुमतात नसल्याने बरखास्त करण्यात यावे आणि काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी द्यावी असे पात्र काँग्रेसने आज राज्यपाल मृदुला सिन्हा यांना देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न केले गेल्यास ती बेकायदेशीर बाब ठरेल. काँग्रेस पक्ष त्यास आव्हान देईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेल्या काही महिन्यांपासून आजारी असून त्यांना हटवून अन्य कुणाकडेतरी मुख्यमंत्रिपद सोपवावं अथवा काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी याआधीही अनेकदा काँग्रेसने केलेली आहे.