हुन्नूर येथे टँकर सुरू ग्रामस्थामधुन समाधान व्यक्त - Pantnagari Times

Breaking News

Thursday, March 14, 2019

हुन्नूर येथे टँकर सुरू ग्रामस्थामधुन समाधान व्यक्तहुन्नूर येथे टँकर सुरू ग्रामस्थामधुन  समाधान व्यक्त


  हुन्नूर / प्रतिनिधी


 मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथे पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अवस्था अतिशय गंभीर बनत चालली आहे. विशेषता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न भयावह होत चालला आहे. 

वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यासंदर्भात नागरिकांकडून मागणी होत आहे. हुन्नूर मधील वाड्या-वस्त्यांवर टँकरची मागणी होत होती. यावर ग्रामपंचायत पाठपुरावा केल्याने हुन्नूर येथे वाड्या-वस्त्यांसाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. गावाला व वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी मिळणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

हळदी कुंकू नारळ वाहुन पहिल्या टँकरची पूजा केली. यावेळी मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ, माजी उपसरपंच राजू पुजारी, माजी ग्रामपंचायत सदस्य  गुलाब माने ,रावसाहेब कोरे, काशिलिंग खताळ, बी. टी .पुजारी ,मच्छिंद्र पुजारी, चंद्रकांत घाडगे ,चंदू पाटील ,मधू सूर्यवंशी ,ननवरे मेजर ,बाबा आमुंगे, सागर खताळ,दत्ता माने, सुरेश क्षिरसागर, बंडू गुरव, बापू भोसले, ग्रामसेवक दत्ता इंगोले ,ग्रामपंचायत शिपाई  पांडुरंग शिंदे, यावेळी  उपस्थित होते.

Pages