मंगळवेढा तालुका पत्रकारसंघाच्यावतीने आंधळगावात मोफत पशु उपचार शिबीर 550 जनावरांवर केले मोफत उपचार
मंगळवेढा / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका पत्रकार संघ, जिल्हा दैनिक वृत्तपत्र पत्रकार संघ, मंगळवेढा तालुका साप्ताहिक संपादक संघटना, महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती मंगळवेढा तालुका व श्रमिक पत्रकार संघ मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने व पशुवैद्यकीय दवाखाना, आंधळगाव यांच्या सहकार्याने आंधळगाव येथील लेंडवे चिंचाळे रोडवरील डांगे वस्ती येथे मंगळवारी घेण्यात आलेल्या मोफत पशु उपचार शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या शिबीराचे उदघाटन जि.प.सदस्या शैला गोडसे यांच्या हस्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मंगळवेढयाचे माजी सभापती अॅड.नंदकुमार पवार, संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे, कृषीनिष्ठ शेतकरी तात्यासाहेब चव्हाण, जिल्हा दूध संघाचे संचालक शिवाजीराव नागणे, संत दामाजी शुगरचे माजी संचालक पांडुरंग भाकरे, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे, माजी अध्यक्ष अॅड.दत्तात्रय तोडकरी, युवक नेते दिनकर भाकरे, उपसरपंच जितेंद्र लेंडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सुरूवातीस गोमातेचे पूजन शैला गोडसे व सोमनाथ आवताडे यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबीरात 550 जनावरांवर मोफत उपचार करण्यात आले. यामध्ये कृत्रिम रेतन, जंत निर्मूलन, वंध्यत्व निर्मूलन, खच्चीकरण, जंतनाशक, गोचिड निर्मूलन, लहान मोठ्या जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण व विविध रोगांवर उपचार करण्यात आले व मिनरल मिश्रण पावडर, जंतनाशक, गोचिड निर्मूलन या सारख्या विविध औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत ओला चारा जनावरांना मिळत नसून जनावरे जगवण्यासाठी पशुपालक ऊसाच्या जास्त वापर करत आल्यामुळे त्यांचे जनावरांवर होणारे दुष्परिणाम, वाढत्या उष्णतेचे परिणाम त्याबाबत उपाययोजना कशाप्रकारे करण्यात यावेत याबद्दल उपस्थित पशुवैद्यकीय अधिकार्यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी भिमराव मोरे, माजी उपसरपंच दिगंबर भाकरे, बाजी डांगे, ग्रा.पं.सदस्य राजेश डांगे, अंकुश डांगे, शशिकांत भिंगे, सत्यवान लेंडवे, अरुण आवताडे, महादेव नागणे, सौदागर डांगे, जोतिराम चव्हाण, अभंगाभाऊ लेंडवे, शिवाजी डांगे, विलास डांगे, सचिन डांगे, सागर डांगे, सदाशिव शिखरे, विनायक करमरकर, कदम, सुखदेव नागणे, सुरज वेळापुरे, आप्पासो स्वामी, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, जिल्हा दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सासणे, तालुकाध्यक्ष मोहन माळी, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद बिनवडे, शिवाजी केंगार, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार जाधव, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष केशव जाधव, जिल्हा दैनिक वृत्तपत्र पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रशांत माळी, पत्रकार प्रमोद बनसोडे, नवनाथ देशमुखे, विलास काळे, म्हाळाप्पा शिंदे व पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पशुपालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविक अॅड.दत्तात्रय तोडकरी यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन तानाजी चौगुले यांनी केले.