शैला गोडसे यांची आसबेवाडी परिसरात म्हैसाळ योजनेचे कामाची पाहणी - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, February 5, 2019

शैला गोडसे यांची आसबेवाडी परिसरात म्हैसाळ योजनेचे कामाची पाहणीशैला गोडसे यांची आसबेवाडी ता. मंगळवेढा परिसरात म्हैसाळ योजनेचे कामाची पाहणी 

मंगळवेढा / प्रतिनिधी

 म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात मंगळवेढा तालुका शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे म्हैसाळ चे पाणी मंगळवेढा तालुक्याला मिळण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मंगळवेढा तालुक्याच्या तेरा गावा पाणी मिळण्यासाठी आंदोलन केले होते. त्यामुळे या गावांना म्हैसाळचे पाणी मिळण्याचा मुद्दा ऐरणीवर आला. यापुढेही हक्काचे पाणी मिळविण्यासाठी  याहीपेक्षा मोठा संघर्ष सर्वांनाच करावा लागणार आहे. त्यामुळे जोपर्यंत मंगळवेढा तालुक्याला म्हैसाळ योजनेचे हक्काचे पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा व संघर्ष  करतच राहू असे मत शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी परिसरात म्हैसाळ योजनेचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करताना बोलत होत्या. यावेळी सरपंच रमेश आसबे, माजी सरपंच भागवत भुसे, दत्ता असबे  रतिलाल आसबे, उल्हास भुसे, नंदू आसबे, संतोष आसबे, नरेंद्र आसबे, तुकाराम असबे, ज्योती मोरे, महादेव बावचे, धनाजी बवचे, कोंडीबा आसबे, कुमार आसबे इत्यादी उपस्थित होते.

म्हैसाळ योजनेतून मंगळवेढ्याच्या हद्दीतील सुमारे 13 गावांना आणि सहा हजार हेक्टर क्षेत्राला शेतीसाठी पाणी मिळणार आहे. या योजनेची मंगळवेढा हद्दीतील कामे प्रगतीपथावर असून जून 2019 पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करून मंगळवेढा हद्दीतील शेतीला पाणी बंद पाइपलाइनमधून उपलब्ध करून देणार असल्याचे लेखी आश्वासन म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी शैला गोडसे यांनी केलेल्या ठीय्या आंदोलनादरम्यान दिले होते. तसेच  म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मंगळवेढा हद्दीतील कामे सुरू असून त्या कामांची पाहणी जिल्हा परिषद सदस्य सौ शैला गोडसे यांनी काही शेतकऱ्यांसमवेत केली आणि या कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.

Pages