हुन्नूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रवीणकुमार (बापू) साळे यांची निवड - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, February 20, 2019

हुन्नूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रवीणकुमार (बापू) साळे यांची निवडहुन्नूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रवीणकुमार (बापू) साळे यांची निवड

 मंगळवेढा / प्रतिनिधी

हुन्नूर तालुका मंगळवेढा येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी प्रवीण कुमार साळे यांची निवड करण्यात आली असून ग्रामपंचायत कार्यालय मध्ये  विशेष सभा बोलावण्यात आली होती 

उपसरपंच पदासाठी प्रवीण कुमार साळे व छाया भारत सूर्यवंशी यांचे प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने चुरस निर्माण झाली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी गुप्त मतदान करण्याचे ठरवले त्यानंतर प्रवीणकुमार साळे यांना पाच ग्रामपंचायत  सदस्यांनी साळे त्यांच्या बाजूने मतदान केल्याने प्रवीणकुमार साळे उपसरपंच म्हणून निवडून आले असल्याचे ग्रामसेवक इंगोले व सिकंदर इनामदार यांनी जाहीर केले 

यावेळी साळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक जयंत साळे, श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रशांत साळे,  माजी सरपंच शशिकांत काशीद, सुरेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शंकर पुजारी, भगवान माने, अनिल चव्हाण, संदीप पवार, अण्णासाहेब शिरसागर, तंटामुक्ती अध्यक्ष असलम मुलांनी, तुशांत माने, बंडू काशीद, विक्रम पुजारी , विकास पुजारी, संतोष मेटकरी, रविराज खडतरे ,देवराज पुजारी, एल बी पुजारी, आकाश भोसले, नवनाथ पुजारी आदी उपस्थित होते

Pages