भोसे / प्रतिनिधी
विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक याचें निधीतून मंजूर झालेल्या भोसे ता मंगळवेढा येथील मुख्य बसस्थानक चौकातील कॉंक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य सुरेश ढोणे व सरपंच दत्ता ताटे याचें हस्ते करण्यात आले
भोसे येथील मुख्य चौकातील रस्त्यासाठी आमदार प्रशांत परिचारक यानी आमदार निधीतून 5लाख रुपये मंजूर केले आहेत तसेच याच चौकात 14व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या मैदानात पेव्हिन्ग ब्लॉक टाकण्यासाठी तीन लाख रुपये भूमिगत गटारीसाठी तीन लाख उर्वरित रस्ता कॉंक्रिटीकरण करनेसाठी तीन लाखाचा निधी 25-15योजनेतून खर्ची टाकण्यात आला असून या सर्व कामाचा शुभारंभ सरपंच दत्ता ताटे याचें हस्ते करण्यात आला यावेळी उपसरपंच अप्प्पासाहेब निकम ग्रा पं सदस्य संभाजी पाटील ,सूर्यकांत स्वामी ,बाळासाहेब काकडे, संजय वाघमोडे, भास्कर दुधाळ, बंडू खडतरे, ग्रामसेवक संजय शिंदे व ग्रामस्थ उपस्थीत होते
भोसे येथील बसस्थानक चौक हा मुख्य व वर्दळीचा चौक असून आठवडा बाजार देखील याच चौकात भरत असलेमुळे या चौकात संपूर्ण कॉंक्रीट रस्ता पेवीण्ग ब्लॉक आदी कामांमुळे या चौकाचे चांगल्या प्रकारे सुशोभीकरण होऊन व्यापारी व ग्राहक या दोघांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे
दत्ता ताटे सरपंच भोसे