आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कुटुंबास तातडीने मदत मिळावी म्हणून प्रहारचे आंदोलन - Pantnagari Times

Breaking News

Thursday, February 28, 2019

आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कुटुंबास तातडीने मदत मिळावी म्हणून प्रहारचे आंदोलन मंगळवेढा /प्रतिनिधी

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावातील शेतकऱी सिद्धाराम विभूती त्यांच्या सातबारा उतार्यावरील सरकार हा शेरा कमी करावा म्हणून अनेक वर्षापासून प्रयत्न करत असताना तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांनी सातबारा उताऱ्यावर सरकार हा शेरा कमी करत नसल्याने कोणतीच शासकीय योजनेचा लाभ मिळत असलेल्या दिनांक 27/2/ 2019 रोजी आपली जीवनयात्रा संपवली.सदरची बाब प्रहार शेतक़री संघटनेच्या टीमला कळताच त्यांनी तात्काळ शासकीय रुग्णालय गाठून मयताच्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारणार असल्याचे आश्वासन दिले.आणि दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केला.आत्महत्या केलेल्या  शतकर्‍याच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आर्थिक साह्य मिळावे  आणि दोषी असलेल्या तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदारावर कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी,अन्यथा  मयताच्या प्रेत जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवून  आंदोलन करणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी याबाबत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना 10 लाख रुपये राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणार आणि दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर आठ दिवसाच्या आत कारवाई  करून त्या गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व इतर अठरा जणांचे सातबारे उतारे कोरे करून देण्याच्या आश्वासन दिल्याने सदरचे आंदोलन थांबवण्यात आल्या.                                                                                 

या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाप्रमुख दत्तात्रय मस्के-पाटील,शहर प्रमुख अजित कुलकर्णी,शहर संपर्कप्रमुख जमीर शेख,शहर कार्याध्यक्ष खालीद मणियार, पंढरपूर सोलापूर युवक प्रमुख नितीन राव बागल,जिल्हा युवक प्रमुख राजेश चव्हाण शहर उपप्रमुख मुश्ताक शेतसंधी, संभाजी व्हनमारे,मुदस्सर हुंडेकरी, अयाज शेख,सिध्दाराम काळे यासह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे तीन्ही मुले, मुस्ती ग्रामस्थ माेठ्या संख्सेने आंदोलनात सहभागी झाले होते.

Pages