मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी ! अण्णा हजारे यांचे उपोषण मागे - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, February 5, 2019

मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी ! अण्णा हजारे यांचे उपोषण मागे
मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी !  अण्णा हजारे यांचे उपोषण मागे  


अहमदनगर / प्रतिनिधी

लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवसांपासून सुरू केलेले उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेतले. आज अण्णांशी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी तब्बल सात तास मॅरॅथॉन चर्चा केली. अण्णांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्याबाबत आपले समाधान झाले असल्याने उपोषण मागे घेत असल्याचे अण्णांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री म्हणाले की,अण्णांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या आहेत.लोकपालच्या नियुक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई होईल.लोकायुक्तांसंदर्भात १३ फेब्रुवारीला बैठक बोलवण्यात येऊन त्यात चर्चा होईल.अण्णांनी केलेल्या मागण्या योग्यच आहेत आणि त्या आम्हाला मान्य आहेत.अण्णांना मुख्यमंत्र्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर अण्णांनी लोकपाल कायद्याची प्रभावी अमलबजावणी आणि लोकायुक्त कायद्याची पुनर्रचना याबाबत मागण्या मान्य केल्याने माझे समाधान झाले आहे.म्हणून मी उपोषण सोडत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की,लोकायुक्त कायदा नव्याने करावा आणि समिती नेमावी. यासंदर्भात ड्राफ्ट कायद्याच्या स्वरूपात मांडण्याची मागणीही मान्य केली आहे.समितीत अण्णांनी सुचवलेले आणि सरकारचे सदस्य असतील.कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याबाबत आम्ही नियम तयार केले आहेत.अण्णांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या वार्षिक मदतीत वाढ करण्याचा विचार करत असल्याचे ते म्हणाले.

Pages