सरकारचा शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा निर्णय क्रांतिकारी - आमदार प्रशांत परिचारक - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, February 20, 2019

सरकारचा शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा निर्णय क्रांतिकारी - आमदार प्रशांत परिचारक


 मंगळवेढा / प्रतिनिधी

गेल्या पन्नास वर्षापासून शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याची मागणी प्रत्येक सरकारकडे शेतकऱ्यांकडून केली गेली आहे. पण प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्षच केले गेले आहे. पण सध्याच्या भाजपा सरकारने या पेन्शन लागू करण्याच्या निर्णयावर ठाम भूमिका घेत पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याची अंमलबजावणीही होईल. अशाप्रकारे भविष्यात शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा भाजप सरकारचा निर्णय क्रांतिकारी ठरणार असल्याचे मत आ. प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. ते मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यात हुन्नूर येथे बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे प्रमुख उपस्थित होते.


पुढे बोलताना परिचारक म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसह सर्वच स्तरातील प्रश्न सोडवण्याचा भाजप सरकार यशस्वी ठरले आहे. गॅस, विज यासारख्या मूलभूत गरजा भाजप सरकारच्या काळात सहजपणे पूर्ण होताना दिसत आहेत. जनावरांचा चार्याच्या बाबतीत छावण्या सुरू करण्यासंदर्भातला निर्णय आता पालकमंत्री घेणार असल्याने छावण्याचे प्रस्ताव त्वरीत दाखल करावेत. तसेच पिण्याच्या पाण्याच्या टँकरची प्रस्तावही दाखल करावेत.

यावेळी हुन्नूर, महदाबाद(हु), रेवेवाडी, मानेवाडी, गावातील ग्रामस्थांनी वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आ.परिचारक यांना दिले. या निवेदनावर विचार करून कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री देशमुख व आ.परिचारक यांनी ग्रामस्थांना दिले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष अशोक सुरवसे, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,युन्नुस शेख, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार श्रीकांत पाटील, कृषी अधिकारी नामदेव गायकवाड, महावितरणचे अधिकारी संजय शिंदे,गटविकास अधिकार आर.आर.जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे माशाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाघमारे,पाणीपुरवठा विभागाचे डांगे,लघु पाटबंधारे विभागाचे पंडित भोसले, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे,माजी शिक्षण सभापती शिवानंद पाटील,युनूस शेख,औदुंबर वाडदेकर,माजी जि. प.सदस्य नामदेव जानकर,

 शाहीर यशवंत खताळ, माजी सरपंच जगन्नाथ रेवे, मिस्टर सरपंच मच्छिंद्र खताळ , दामाजी साखर कारखाना माजी संचालक महादेव कोरे, तम्माकाका चौगुले, मार्केट कमिटीचे माजी सभापती  काकासाहेब मिसकर माजी उपसरपंच राजाराम पुजारी, ह.भ.प व्होनमोर महाराज, सिद्धेश्वर मेटकरी गुलाब माने, महादेव पाटील, बी. टी. पुजारी, शहाजी सूर्यवंशी, ज्योतिबा पुजारी, ज्ञानदेव घाडगे, काशिलिंग खताळ, ब्रह्मदेव रेवे, पोपट शिंदे, मच्छिंद्र पुजारी, मधु सूर्यवंशी, सुरेश शिरसागर, रेवेवाडीचे ग्रामसेवक  सिकंदर इनामदार हुन्नूरचे ग्रामसेवक आदी उपस्थित होते इंगोले आदी उपस्थित होते. 

यावेळी लोकनियुक्त सरपंच मनीषा मच्छिंद्र खताळ यांचा सत्कार पालकमंत्री विजयकुमार देशमुख जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.

Pages