केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी उड्डाण मंत्री ना सुरेश प्रभु यांच्या हस्ते अध्यक्ष अंकुश पडवळे यांचा कृषीभुषण पुरस्कार जाहिर झाले बद्दल सत्कार.... - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, February 5, 2019

केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी उड्डाण मंत्री ना सुरेश प्रभु यांच्या हस्ते अध्यक्ष अंकुश पडवळे यांचा कृषीभुषण पुरस्कार जाहिर झाले बद्दल सत्कार....


पुणे / प्रतिनिधी

काल केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी उड्डाण मंत्री  ना सुरेश प्रभु यांच्या हस्ते अध्यक्ष अंकुश पडवळे यांचा कृषीभुषण पुरस्कार जाहिर झाले बद्दल सत्कार....

अपेडा मार्फत काल ॲग्रो एक्सपोर्ट कार्यशाळेतच प्रगतशिल शेतकरी अंकुश पडवळे यांचा कालच कृषीभुषण पुरस्कार जाहिर केल्या बद्दल केंद्रीय वाणिज्य मंत्री ना. सुरेश प्रभु यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

सदर कार्यशाळेस राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल, अपेडाचे चेअरमन पबनकुमार बोरठाकूर, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे सहसाचिव संतोषकुमार सरंगी, राज्याचे पणन संचालक दिपक तावरे, कृषीआयुक्त एस. पी. सिंग, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, अपेडाचे AGM प्रशांत वाघमारे, सरव्यवस्थापक दिपक शिंदे, उपसरव्यवस्थापक भास्कर पाटिल आदि व्यासपीठावरा उपस्थित होते......

  कालची ॲग्रो एक्सपोर्ट कार्यशाळा चालू असतानाच शासनाने अंकुश पडवळे यांना कृषीभुषण पुरस्कार जाहिर केल्याचे संयोजकांना समजल्यावर सदर कार्मात अंकुश पडवळे यांचा मंत्री महोदयाच्या हास्ते विशेष सत्कार करण्यात आला. शासनाचा पुरस्कार सदर कार्यशाळेत मोर्फा चे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या व निर्यातदार यांच्या अडचणी सांगू अने शेतकरी कंपन्याच्या प्रश्नाकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. सदर वेळी मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे, संचालक अमरजित जगताप, मयुर कदम सह राज्यभरातून आलेले शेतकरी कंपनीचे प्रतिनीधी व निर्यातदार उपस्थित होते.

Pages